You are currently viewing तिलारी घाटात कंटेनरला जयकर पाँईट येथे अपघात

तिलारी घाटात कंटेनरला जयकर पाँईट येथे अपघात

तिलारी घाटात कंटेनरला जयकर पाँईट येथे अपघात

सावंतवाडी

तिलारी घाटात सकाळी ८च्या सुमारास कंटेनरला जयकर पाँईट येथे अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जिवीत हानी घडली नाही.हा कंटेनर तिलारीनगरहुन सामान घेवुन गोव्याच्या दिशेने जात होता.हा जयकर पाँईट येथील तीव्र उतारावर आला असता.ब्रेकमधील एयर कमी झाल्याने ब्रेक निकामी झाले असता कठड्यावर हा कंटेनर आढळला.व तेथेच थांबला असता चालक बाहेर पडला परंतु दुसर्‍या बाजुने असणारा वाहक हा आतच अडकला.तो जखमी झाला.यावेळी माझा सिंधुदुर्ग ब्रेकींगचे तालुका प्रतिनिधी प्रथमेश सावंत व त्यांचे वडील प्रकाश सावंत हे तिलारीनगर येथे जात होते त्यांनी या ठीकाणी धाव घेत आणखी काही लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढुन १०८शी संपर्क करुन त्या वाहकाला अधिक उपचारासाठी चंडगड येथे दाखल करण्यात आले.
तिलारी घाटातील अपघातांचे सञ काही केल्या कमी होत नाही.त्यामुळे यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा