You are currently viewing २७ दिवसांनंतर कणकवली बसस्थानकातून एस. टी बस धावली

२७ दिवसांनंतर कणकवली बसस्थानकातून एस. टी बस धावली

बस मार्गस्थ होताना ठेवण्यात आला कडक बंदोबस्त

कणकवली

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस.टी.सेवा बंद झाली आहे.हि लॉक झालेली सेवा अनलॉक करण्याच्या दृष्टीने एस.टी. प्रशासनाने पावले उचलत पोलिसांच्या मद्तीने तब्ब्ल २७ दिवसांन नंतर कणकवली आगारातून कणकवली – सावंतवाडी एस.टी.बस सेवा सव्वादोनच्या सुमारास मार्गस्थ केली.यावेळी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना महामंडळच्या अधिकाऱ्यांनी पुष्पदेत त्यांचे स्वागत केले.

दरम्यान परिवहन मंत्र्यांच्या दबावाखाली येवून प्रशासनाने जिल्ह्यात एस. टी सेवा सुरु करण्यासाठी पावले उचलली आहेत.त्यांच्या कृतीचा संपकरी कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. संपकरी एस टी कर्मचाऱ्यानी पुन्हा कामावर रुजू व्हावे यासाठी कर्मच्राऱ्यांशी आपण चर्चा करत आहोत.जे कर्मचारी कामावर हजर होतील त्याना घेवून एस टी सेवा पुन्हा पूर्वरत करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी बोलताना सांगितले. एस.टी.चे शासनात विलनीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.त्यामुळे सिंधुदर्गातील एस टी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.सरकार व एस.टी.प्रशासन या संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.मात्र संपकरी आपल्या मागन्यावर ठाब असल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.तर कर्मचाऱ्यांना पुन्हा कामांवर हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.जे कामगार हजर होत आहेत.त्यांना घेवून एस सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.त्यानुसार आज कणकवली आगारातून कणकवली सावंतवाडी पहिली एस टी बस सावंतवाडीच्या दृष्टीने मार्गस्थ झाली.हि बस मार्गस्थ होताना पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बस मार्गस्थ होण्यापूर्वी एस टी च्या अधिकाऱ्यांनी एस टी ला हार घालून आणि प्रवाशांचे स्वागत करून एस. टी.चालकाने सावंतवाडीच्या दिशेने मार्गस्थ केली. यावेळी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ,एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी मोहनदास खराडे, ल.रा.गोसावी, श्री. मदने, आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, विनय राणे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही एम चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचारी कैलास इंपाळ,मंगेश बावदाने,आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 20 =