You are currently viewing जिल्ह्यात 5 मार्चपर्यंत अनाथ पंधरवडा  

जिल्ह्यात 5 मार्चपर्यंत अनाथ पंधरवडा  

जिल्ह्यात 5 मार्चपर्यंत अनाथ पंधरवडा

सिंधुदुर्ग 

जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीमध्ये अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तालुका तहसीलदार कार्यालयामध्ये तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली आहे.

                अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा याकरीता महिला व बालविकास विभागामार्फत अ, ब व क प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदार यांच्या आई व वडील यांचा मृत्यु दाखला, अर्जदार यांचा जन्म दाखला, ग्रामसेवक यांचा बालकाचे अनाथ प्रमाणपत्र सिध्द करण्यासाठीचा दाखला, पोलीस पाटील यांचा रहिवाशी दाखला, आधारकार्ड, रेशनिंगकार्ड, जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदानकार्ड, महाराष्ट्र राज्य वय व अधिवास दाखला इ. कागदपत्रे सदर अनाथ बालकांना सदर पंधरवड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून तात्काळ कार्यवाही होणार आहे.

               यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार कार्यालय येथे संपर्क साधावा. अनाथ प्रमाणपत्र माहितीसाठी  (परीविक्षा अधिकारी) महेश सावंत  मो. 9423303064, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी मो. 9404444922, संरक्षण अधिकारी बिगर संस्थात्मक काळजी, दिपिका सावंत 9730247898 या क्रमांवर संपर्क साधावा, असे  जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + nineteen =