You are currently viewing तिलारी कालव्यात कार कोसळून अपघात…

तिलारी कालव्यात कार कोसळून अपघात…

सुदैवाने प्रवाशी बचावले…

दोडामार्ग
साटेली भेडशी येथील तिलारी कालव्यात आज सकाळी दहाच्या सुमारास कार कोसळली आहे. हा अपघात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडला आहे. या अपघातात सुदैवाने गाडीतील आठ ही प्रवाशी सुखरूप असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी तेथील स्थानिक ग्रामस्थ सुशांत गवस, ईश्वर गवस, रुपेश गवस, राजू नाईक, श्यामसुंदर धर्णे आदींनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन त्या पर्यटकांना बाहेर काढले आहे. गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना असून मुख्य रस्त्याच्या बाजूलाच कालवे असल्याने हे अपघात होत असून, हे अपघात टाळण्यासाठी तिलारी बांधकाम विभागाने याची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =