पुणे :
स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली व महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गझलकारा सौ.कल्पना गवरे यांच्या “कल्पनेचा फुलोरा” या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा दिनांक १० मार्च २०२४ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजता शांताबाई शेळके सभागृह, पिंपरी चिंचवड प्राधिकरण, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी मा.सनदी अधिकारी (IAS) दिलीप पांढरपट्टे, राजन लाखे (अध्यक्ष म.सा.प.पिंपरी चिंचवड), डॉ..इकबाल मिन्ने (अध्यक्ष, विश्व गझल परिषद), ज्येष्ठ गझलकारा सुनंदामाई पाटील (गझलनंदा), गझलकार म. भा. चव्हाण, गझलकार आप्पा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी सौ.कल्पना गवरे यांच्या गझलांचा प्रसिद्ध गायक व संगीतकार अतुल दिवे व वैशाली राजेश यांच्या सुमधुर आवाजात गायनाचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे.
सदर प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अनेक मान्यवर साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने प्रा.मकरंद गोंधळी, श्री.अनिल मुंजाळ, श्री.पांडुरंग कुलकर्णी, श्री. प्रकाश पारखी, श्री. शिरीष चिटणीस, श्री.दीपक पटेकर, श्री. रघुनाथ पाटील, श्री. अनिल वाघमारे आदींना खास निमंत्रित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्ध गझलकार श्री.रविंद्र सोनावणे, सूत्रसंचालन श्री.संतोष घुले, आभार डॉ. संजय जगताप हे मानतील. अशी माहिती स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ.कल्पना गवरे यांनी दिली आहे.