You are currently viewing वायंगणी येथे कासव महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

वायंगणी येथे कासव महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

वेंगुर्ला :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यातील ‘कासवांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या वायंगणी येथे कासव महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. दोन दिवस चालणार्‍या या कासव महोत्सवाचे आयोजन सावंतवाडी वनिवभाग आणि समस्त ग्रामस्थ वायंगणी यांच्यावतीने करण्यात आले. या कासव महोत्सवास उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय शालेय शिक्षणमंत्री मा. ना श्री दीपकभाई केसरकर उपिस्थत होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उद्घाटन प्रसंगी उपस्थिती होते. यावेळी ऑलिव्ह रिडले कासवांच्या वाळू शिल्पाचे अनावरण मा. दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या तसेच निसर्गप्रेमी आणि पयर्टक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑलिव्ह रिडले कासवांच्या नवजात पिल्लांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

कायर्क्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी केले. या महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते स्थानिक कासवमित्र यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर मानद वन्यजीव रक्षक श्री नागेश दप्तरदार यांनी कासवाबंददल माहिती देणारे सादरीकरण केले. तसेच विविध दुर्मिळ समुद्र वन्यजीवांची माहिती, कासवांचा जीवनक्रम व त्याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान उपस्थित निसर्गप्रेमींना दिले. कायर्क्रमाच्या पुढील सत्रात निसर्गप्रेमींना ‘कोकणी रानमाणूस’ यांनी वन्यजीव संवर्धन कायार्त स्थानिक लोकांचा सहभाग आणि पयार्वरण पूरक निसर्गपयर्टन या विषयी आपले विचार मांडले. यानंतर पुढील सत्रात विविध ठिकाणी क्षेत्रभेट, परिसंवाद आणि रात्री सांस्कृतिक कायर्क्रम दशावतार नाटक “कुर्मा अवतार” आयोजित करण्यात आले. कायर्क्रम प्रसंगी सावंतवाडी प्रांतािधकारी श्री निकम, वायंगणी ग्रामपंचायत सरपंच श्री अवी दुतोंडकर, सावंतवाडी सहा. वनसंरक्षक श्री सुनील लाड, इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

तसेच या महोत्सवा नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समुद्रिकनार्‍यावर असणार्‍या हॅचरी मधून जसे की फळीयेफोंडा, सागर तीर्थ , उभादांडा, तोंडवली, तळाशील, आचरा, मोचेमाड, इत्यादी ठिकाणाहून पिल्लांना निसगार्त अधिवासात मुक्त करताना स्थानिक कासवमित्रांच्या मदतीने पाहण्याची संधी निसर्गप्रेमींना मे २०२४ पर्यंत मिळणार आहे. त्या किरता संबंधित ठिकाणच्या वनविभागाच्या अधिकारी व कमर्चारी यांची परवानगी आवश्यक राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा