You are currently viewing वैभववाडी, देवगड पुलाच्या कामांना १३ कोटी ३७ लाख मंजुर

वैभववाडी, देवगड पुलाच्या कामांना १३ कोटी ३७ लाख मंजुर

वैभववाडी, देवगड पुलाच्या कामांना १३ कोटी ३७ लाख मंजुर…

आमदार नितेश राणेंचा पाठपुरावा; ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त…

कणकवली

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ नाबार्ड अर्थसहाय्यमधून आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीने देवगड व वैभववाडी तालुक्यातील एकूण १३ कोटी ३७ लाख रकमेच्या पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून या कामांची वारंवार मागणी होत होती. संबंधित कामांना मंजुरी मिळाल्याने जनतेची होणारी दळणवळणाची गैरसोय दूर होऊन जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यामध्ये फणसगाव महाळुंगे गढीताम्हाणे वळीवंडे रस्ता साखळी क्रमांक ४/२०० वर पुलाचे बांधकाम करणे. (रुपये ११ कोटी ५४ लाख), सांगुळवाडी फाटकवाडी रस्ता साखळी क्रमांक ३/१०० वर पुलाचे बांधकाम करणे. (रुपये १ कोटी ८३ लाख) ही कामे मंजूर झाली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + nineteen =