You are currently viewing पीळ पडतो श्वासांना

पीळ पडतो श्वासांना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पीळ पडतो श्वासांना*

 

अनाथाश्रमात छोटी

दिसतात हो बालकं

चित्र भासते विदीर्ण

होतं काळीज हलकं….

 

मुक्या जनावरांवर

भार ओझ्याचा केवढा

दडपतो जीव बघा

काळजात पिळे फार…

 

ऋण विसरून मुलं

वृध्दाश्रमी आईबाप

कृतज्ञता विसरता

नेत्री अश्रू आपोआप…

 

पाणी नाही त्राही त्राही

चोच पडते उघडी

अन्नासवे प्लास्टिकही

पोटी गायीच्या केवढी…

 

पहाटेचा सूर्योदय

आता दृष्टीपथी नाही

उंच इमारती मागे

सारे अदृश्य राही …..

 

मन हवा प्रदूषित

संस्कारांनी हवी खीळ

आज बघता समाज

श्वासांनाही पडे पीळ….।।

 

००००००००००००००००००००००🥀०🥀०

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + sixteen =