You are currently viewing स्मृतीगंध

स्मृतीगंध

“स्मृतीगंध’

आपल्या देशाचे माजी सभापती, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि हिंदुह्यदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक जोशी सरांच्या दु:खद निधनाची दुर्दैवी बातमी समजली. सरांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मुख्यमंत्री असताना मी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष स्व. श्रीपादजी काणेकर व मी दोनवेळा स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या सोबत जोशी सरांना विधानभवनात भेटलो. त्या काळात आताच्या सारखे क्लीक करायला भ्रमणध्वनी नव्हते.
गेल्या सुमारे पंचेचाळीस वर्षाहून जास्त काळ विविध कार्यक्रमांचे तीसहून जास्त अल्बम व शेकडो फोटोंचा संग्रह आहे. यात आज स्व. जोशी सरांचे कार्यक्रमातील दोन फोटो आढळले. थोडेसे अस्पष्ट आहेत. सर मुख्यमंत्री असताना व लोकसभेचे सभापती असताना शिवसेनेच्या वतीने दोन वेळा महोत्सव घेण्यात आले होते. त्यावेळी माझी छोटी कन्या प्रिया हिने नृत्य सादर केले होते…. जोशी सर अगदी कौतुकाने त्या छोट्या छकुलीचे नृत्य पहात होते.
या छायाचित्रात मा. नारायणराव राणे, अभिनेते जॅकी श्रॉफ, जोशी सर, माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू आदी मान्यवर दिसत आहेत….
आता राहिल्या फक्त आठवणी..
तत्त्वनिष्ठ राजकारण करणाऱ्या आणि अखेरचा श्वासापर्यंत विचारांशी ठाम रहाणाऱ्या जोशी सरांना भावपूर्ण आदरांजली..

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =