कार्य विरार शिवसेनेचे !!
मागील 08 दिवसांपुर्वी मनवेलपाडा गाव येथील स्मशानभुमी समोर कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे नाल्यात पडुन बाईक स्वाराचा मोठा अपघात घडला.
या अपघाताची माहिती मिळताच शिवसेना उपशहरप्रमुख श्री. उदय अ. जाधव यांनी घटनास्थळी शिवसैनिकांसह धाव घेऊन अपघाताची पाहणी केली व महानगरपालिकेच्या संबंधित विभागात याविषयी तक्रार केली व अर्धवट स्थितीत असलेल्या नाल्यामुळे तसेच कंत्राटदार कडुन सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याने स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
याविषयी वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग अभियंता श्री. आर. के. पाटील साहेब व अभियंता श्री. रनमाळे यांची घटनास्थळी भेट घेऊन त्यांच्यासह अर्धवट असलेल्या नाल्याची पाहणी करून घडणार्या अपघाताची माहिती दिली व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली तसेच नाल्याचे काम पुर्ण होईपर्यंत नागरिकांच्या जीवाशी खेळ होणार नाही अशा पध्दतीने सुरक्षिततेची काळजी घेऊन नाल्याआड येणारा विजेचा ट्रांसफर्मर योग्य ठिकाणी बसवुन लवकरात लवकर नाल्याचे काम पुर्ण करावे व स्थानिक रहिवाशांना दिलासा द्यावा अशी विनंती केली.
यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभाग अभियंता श्री. आर. के. पाटील हे सुध्दा उपस्थित हाेते