You are currently viewing महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी, कामगार पद्धती द्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्यांसह विविध १७ मागण्यांची पूर्तता करणे संदर्भात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने…

महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी, कामगार पद्धती द्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्यांसह विविध १७ मागण्यांची पूर्तता करणे संदर्भात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने…

महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी, कामगार पद्धती द्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्यांसह विविध १७ मागण्यांची पूर्तता करणे संदर्भात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने…

सिंधुदुर्ग

आपल्या विविध १७ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाच्या बाहेर निदर्शन केली. ‘असे कसे देत नाही? घेतल्याशिवाय जात नाही,’ अशी घोषणाबाजी आंदोलकांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी चंग बांधला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या, तसेच महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या ३ वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार आदी मागण्यांसाठी राज्यभर बुधवारी कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांच्या नेतृत्वात निदर्शने केली.

या तीनही कंपनीतील कंत्राटी कामगार हे अनुभवी व कुशल आहेत. १५ ते २० वर्षांपासून ते काम करत आहेत. या कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या अनेक संघटनांनी शासन दरबारी मांडल्या. मात्र या कामगारांना अद्याप न्याय मिळाला नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली. या समितीने आपल्या १७ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत.

तीनही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक पूरक भत्ता १ एप्रिल २०२३ पासून ३० टक्के वेतनवाढ मिळावी, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, तीनही वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदांवर व गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामात समान वेतन मिळावे, कंत्राटी कामगाराच्या अपघाती मृत्यूनंतर वारसांना दिली जाणारी आर्थिक मदत वाढवून १५ लाख रुपये मिळावी, अशा अनेक मागण्या कंत्राटी कामगारांनी केल्या आहेत.

बुधवारी सकाळपासून कंत्राटी कामगार धरणे आंदोलनाला बसले होते. यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेत आम्हाला न्याय द्या, अशी मागणी लावून धरली. यावेळी कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =