You are currently viewing स्वा. सावरकर रचित निवडक गीतांवर नृत्याविष्कार कलासक्त संस्थेतर्फे संपन्न

स्वा. सावरकर रचित निवडक गीतांवर नृत्याविष्कार कलासक्त संस्थेतर्फे संपन्न

निगडी प्राधिकरण-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, महिला विभागा तर्फे दिनांक २०/०२/२०२४ रोजी कलासक्त नृत्य संस्थेचा ” यशो युताम् वंदे ” हा नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वा.सावरकर यांच्या स्वरचित निवडक गीतांवर भरत नाट्यम् शैलीतील नृत्याविष्कार सादर करण्यात आले.

हे नृत्यप्रदर्शन म्हणजे देशभक्ती आणि त्यागाचा उत्कट अनुभव होता. वीर सावरकरांच्या श्रवणीय “जयोस्तुते” ह्या रचनेने आरंभ झालं. त्या नंतर सर्व धर्म समभाव असलेले “तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू”, “अनादी मी अनंत मी अवध्य मी”ह्या गीतांवर ,तसेच त्यांनी लिहिलेल्या यही पवोगे ह्या गझलवर अतिशय प्रेक्षणीय नृत्य सादर केले. छत्रपतींशिवाजी महाराजांच्या आरती वर प्रभो शिवाजीराजा ह्या रचनेवरील जोषपूर्ण नृत्याचा वेगळाच अनुभव होता. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम्” ह्या रचनेवर नृत्य सादर करून झाली.

कार्यक्रमाची सुरवात प्रार्थनेने झाली, त्यानंतर मंडळाच्या कार्याध्यक्ष सौ.अश्विनी अनंतपुरे, सह- कार्याध्यक्ष सौ. वैदेही पटवर्धन , कलासक्त संस्थेच्या सौ. स्मिता सोमण ह्यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विभागाच्या अध्यक्ष सौ. शीतल गोखले यांनी केले. तसेच ,नृत्यसंस्थेचा परिचयही त्यांनी करून दिला. महिला विभागाच्या कार्यकारिणी सदस्य ॲड. सौ. हर्षदा पोरे ह्यांनी आभार प्रदर्शन व काही महत्वाची निवेदने केली. नृत्य संस्थेच्या कलाकारांचा सत्कार महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

सर्व प्रेक्षकानी या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =