You are currently viewing “निष्कलंक, चारित्र्यवान प्रवीणभाईनां वाढदिवसाच्या शुभेच्छा”

“निष्कलंक, चारित्र्यवान प्रवीणभाईनां वाढदिवसाच्या शुभेच्छा”

“निष्कलंक, चारित्र्यवान प्रवीणभाईनां वाढदिवसाच्या शुभेच्छा”

Politics is a last destination of crime… या वाक्याची आपण सर्वचजणं अनुभूती घेत आहोत. आजची एकंदरीत परिस्थिती पहाता सर्वसामान्य माणसाची राजकारणा बाबत प्रचंड चीड आणि नकारात्मकता आहे. अशावेळी राजकारणात इतकी वर्षे सक्रिय राहूनही या क्षणापर्यंत ज्या माणसांवर कधीही एक रूपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही.. ना कधी कोणत्याही वादग्रस्त विषयात त्यांच नांव घेतल नाही.. अशी निर्मळ मनाचे आणि स्वच्छ चारित्र्याचे आमचे परम मित्र आणि हितचिंतक म्हणजे प्रवीण प्रतापराव भोसलें.
मा. शरद पवारसाहेबांच्या काळात ते महाराष्ट्राचे राज्यमंत्री होते तेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. तेव्हापासूनचा माझा आणि भाईंचा परिचय. राज्यमंत्री असताना भाईंचे पाय जमीनीवरचं होते. राजकारणात “माणूस” म्हणून जगणे फार कठीण असतं.. त्यामुळेच भाई राजकारणात यशस्वी होवू शकले नाहीत. संयमी, शांत स्वभावाच्या भाईना राजकारणातले “चेहरे” ओळखता न आल्याने आणि विश्वासघाताचं राजकारण न समजल्याने भाई मागे राहिले. शंभर कॅरेट लबाडी करणे भाईना जमले नाही.. ज्यानां ती जमली ते सत्ता स्थानी टिकले.
भोसले घराण्याला मुळातचं त्यागाची आणि सेवाभावी राजकारण करण्याची पार्श्वभूमी. याच वातावरणात भाईंची जडणघडण झाली. त्यांनीं ज्या कार्यकर्त्यांना आपल्या अनुकूल परिस्थितीत सन्मान दिला ते अनेकजण आज विविध राजकीय पक्षात सक्रिय आहेत. अशा अनेकाबरोबर आजही भाईंचे स्नेहाचे संबंध आहेत.
राजकारणाचे संदर्भ, आयाम आणि निवडणुकीचा पॅटर्नही पुर्णपणे बदललेला आहे. अशा परिस्थितीत यापुढे राजकारण करणे हे भाईंच्या स्वभावाला पेलणारं नाही. त्यामुळे ते ज्या पक्षात काम करत आहेत त्या पक्षातील तरूण नेतृत्वाला आशिर्वाद देणे व मार्गदर्शन करणे ही वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. नाहीतर राजकारण हे असं एक व्यसन आहे की वार्धक्य आलं तरी व्हीलचेअरवर बसून राजकीय पक्ष चालवणारे अनेक महाभाग या देशात आपण अनुभवलेले आहेत.
भाईंचे राजकारणात असूनही सगळ्यांशीच माणूस म्हणून वागणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. मला आठवत १९८५/८६ चा काळ असेल मी तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे काम करत होतो. तेव्हा आमचे प्रेरणा स्थान आणि थोर विचारवंत माजी आमदार अशोकराव मोडक हे विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई त्यावेळच्या काँग्रेस सरकारच्या शैक्षणिक विरोधात विराट मोर्चा काढला होता. त्यासाठी मी आणि माझे काही सहकारी निधी संकलन करत होतो. विरूद्ध विचार धारेचे काम करणाऱ्या भाईंकडे गेलो.. भाईनी चहा पाजला. मी विषय सांगितला… भाई नुसते हसले आणि त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता शंभर रूपयाची मदत केली. ज्या काँग्रेसचे ते नेतृत्व करत होते त्यांच्या विरोधात मोर्चा तरीही भाईनी आम्हांला रिकाम्या हाताने पाठवलं नाही.
माझ्या प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात ते जातीने हजर असतात. माझ्या छोट्या मुलीच्या महिन्या भरापूर्वी राजवाड्यात संपन्न झालेल्या सोहळ्यासाठी मी त्यांना वीस दिवस अगोदर निमंञण दिलं. भाई म्हणाले “इतक्या लवकर, ह्या वयात कसा लक्षात रवताला,जरा आदल्या दिवशी आठवण करा”.. मी भाईना आठवण केली. भाई आवर्जून आले.. खूप वेळ थांबले… जाताना भाई म्हणाले” नकुलजी तुम्ही फार श्रीमंत आहात.. तुमच्यावर प्रेम करणारी विविध क्षेत्रातील असंख्य मंडळी आलेली आहे. नियोजनही सुंदर केलतं .फार बरं वाटलं” आजकाल चांगल्या गोष्टीचं कौतुक करुन प्रेरणा देणाऱ्या पेक्षा जलसीचाचं जास्त अनुभव येतो. माझ्या माजगाव येथील घराचं भूमीपूजन भाईनीचं केल होत. ज्या वास्तुला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे पाय लागले.
आज भाईंचा ७५ वा वाढदिवस. भाईंकडे पाहिल्यावर ते ७५ वर्षाचे झालेत असं वाटतं नाही.. कदाचित राजकारणात राहूनही भाईनी प्रामाणिकपणे जपलेल्या नैतिकतेचा परिणाम असावा. भाई, तुम्ही राजकारणात सत्तेत असताना सत्तेचा गैरवापर करून, लबाडी करुन भले गडगंज संपत्ती कमावली नसेल… पण समाजात तुमची असणारी प्रतिमा ही लाखमोलाची आहे. लबाडीने केलेलं राजकारण, संधीसाधूपणा आणि विश्वासघात हे अळवावरच्या पाण्यासारखं क्षणिक असतं… पण तुमच्या बद्दलच्या आदरयुक्त भावना या लाखमोलाच्या आहेत आणि तुम्ही त्या जपतं आहात हेच तुमचं ऐश्वर्य आहे.
भाईंची माझी मैञी होण्याचा एक समान दुवा म्हणजे जेव्हा जेव्हा भाईंशी राजकारणावर चर्चा होते तेव्हा प्रवीण भाई हे भारतरत्न स्व. अटलजी,स्व.मनोहरभाई पर्रीकर, मा. सुरेशजी प्रभू अशा चारित्र्यसंपन्न व कर्तुत्ववान नेत्याबाबत कौतुकाने व आदराने भरभरून बोलतात.. भाई, तुम्हीनांवाने प्रवीण आहात पण आजच्या बजबजपुरीच्या आणि दलदलीच्या राजकारणात तुम्हांला “प्रावीण्य” जरी मिळवता आलं नाही तरी जनमानसातील तुमची प्रतिमा हीच तुमची श्रीमंती आहे.
यापुढील काळातही आपणासं परमेश्वराने उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो. आपली शंभरावी साजरी करण्याची संधीही आम्हांला मिळो अशी मनोमन प्रार्थना तुमचे आणि आमचेही श्रध्दास्थान असलेल्या श्री देव पाटेश्वराकडे प्रार्थना करतो. स्नेहप्रिया परिवाराकडून आपणासं वाढदिवसाच्या शुभेच्छा.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + nine =