You are currently viewing फोंडाघाट येथे स्थानिक आणि कोल्हापूर येथील युवकांमध्ये आज पहाटे हाणामारी

फोंडाघाट येथे स्थानिक आणि कोल्हापूर येथील युवकांमध्ये आज पहाटे हाणामारी

फोंडाघाट येथे स्थानिक आणि कोल्हापूर येथील युवकांमध्ये आज पहाटे हाणामारी

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये हॉटेलमध्ये झालेल्या वादात पर जिल्ह्यातील तरुण व स्थानिकांमध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार राडा झाला. यात एकमेकांना चोप देण्याचा देखील प्रकार घडला. त्यानंतर स्थानिकानी आक्रमक भूमिका घेत कोल्हापूरच्या तरुणांची गाडी देखील फोडली. या फ्री स्टाईल हाणामारीमध्ये दोन्ही बाजूचे युवक जखमी झाले. या घटनेनंतर जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. किरकोळ विषयाच्या वादाचे रूपांतर बाचाबाची होत त्यानंतर हा राडा झाला.

दरम्यान या घटनेनंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फोंडाघाट व पर जिल्ह्यातील तरुण यांची मंगळवारी सकाळी गर्दी झाली होती. कोल्हापूर येथील सहा तरुण चार चाकी घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता घाट पायथ्यालगत एका हॉटेलवर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चहा घेण्यासाठी थांबले होते. यादरम्यान त्या हॉटेलमध्ये स्टूल वर बसण्यावरून तेथील पर जिल्ह्यातील व जिल्ह्यातील तरुणांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यवसन हाणामारीत होत दोन्ही बाजूची तरुण एकमेकांना भिडले. यादरम्यान कोल्हापूर येथील तरुणांची गाडी स्थानिकांकडून फोडण्यात आल्याचे समजते. या घटनेनंतर दोन्ही बाजूच्या जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दोन्ही बाजूने प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =