You are currently viewing मळेवाड जकातनाका येथे तिहेरी अपघात गाड्यांचे मोठे नुकसान 

मळेवाड जकातनाका येथे तिहेरी अपघात गाड्यांचे मोठे नुकसान 

सुदैवाने जीवितहानी नाही

सावंतवाडी

मळेवाड जकातनाका येथे तिहेरी अपघातात चार चाकीचे मोठे नुकसान झाले. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर कळणेहून रेडीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने मळेवाडहून कळणेच्या दिशेने जाणाऱ्या डंपरला ठोकर दिली. त्यानंतर ठोकर दिलेल्या डंपरचे पाटे तुटल्याने समोरून येणाऱ्या चार चाकी ब्रेजा गाडीला डंपरने ठोकर दिली. यात चार चाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी नाही. या अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. उशिरापर्यंत अपघाताची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − ten =