You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज – नितीन धुरी

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज – नितीन धुरी

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज – नितीन धुरी

सिध्दभराडी ओसरगाव क्रिकेट संघाच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

कणकवली (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन नितीन धुरी यांनी केले.

ते ओसरगाव गवळवाडी येथे शिवजयंती उत्सव कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ओसरगाव गवळवाडी येथील सिध्दभराडी ओसरगाव क्रिकेट संघाचे चेतन राणे ,नितीन धुरी, सुरज कदम, महेश वारंग ,रोशन राणे, सुनील राणे, ओमकार राणे ,विशाल राणे, कार्तिक राणे, प्रवीण मोरे, अक्षय राणे, दिनेश अपराज, ओमकार मोरे, रोहित राणे, आदित्य राणे, रोहन राणे ,शुभम राणे, हर्षद राणे यांच्यासह किशोर तांबे, रसिका तांबे, अक्षता राणे माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर कदम ,शितल दळवी, सुप्रिया महाजन आदी उपस्थित होते

कणकवली तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील सिध्दभराडी ओसरगाव क्रिकेट संघ शिवजयंतीचे औचित्य साधून सलग चार वर्षे कला, क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य इत्यादी विविध उपक्रम राबवित आहेत .

रक्तदान शिबीर, ओसरगाव प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा, शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत आहे.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ मिळवून दिले आहे.

ओसरगाव गवळवाडी येथे सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जय शिवाजी, जय भवानी च्या गजरात ओसरगाव परीसर दुमदुमून गेला.

यावेळी ओसरगाव गवळवाडी शाळा,ओसरगाव शाळा क्रमांक १, ओसरगाव बौद्धवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे, आणि गाणी सादर केली.तसेच शिव जयंती निमित्त ‌ विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा