You are currently viewing लवकरच राज्यातील सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार – परशुराम उपरकर

लवकरच राज्यातील सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार – परशुराम उपरकर

लवकरच राज्यातील सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार – परशुराम उपरकर

कुडाळ

जिल्ह्यातील लोकांची सेवा करायची आहे. त्यामुळे लवकरच आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आपण सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार आहोत. याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसात घेऊ मात्र कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय कार्यकर्ते घेतील, असे सुतोवाच माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केले. दरम्यान आता मी मनसेवर कोणतीही टीका करणार नाही. मनसेने जनतेची कामे करावी, आपला पक्ष वाढवा, आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देऊ नये, आम्ही तुमच्याशी फारकत घेतली आहे. त्यामुळे निरीक्षकांनी आमच्यावर ठिका करू नये तसा प्रकार झाल्यास आम्ही समर्थ आहोत, असाही इशारा ही दिला आहे.
मनसेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर श्री. उपरकर यांची राजकीय पुढील वाटचाल कोणती? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले होते. या पार्श्वभूमीवर आज कुडाळ येथे समर्थकांचा मेळावा पार पडला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी प्रसाद गावडे, विनोद सांडव, आशिष सुभेदार, बाबल गावडे, आपा मांजरेकर, मंदार नाईक, दीपक गावडे, आदेश सावंत, राजेश टंगसाळी, आबा चिपकर, प्रकाश साटेलकर, बाळकृष्ण ठाकूर, प्रतीक कुबल, संदीप लाड, अमोल जंगले, अभय देसाई, सत्यविजय कविटकर, सदाशिव गुरव, सुंदर गावडे, दत्ता गावडे, विजय जांभळे, गुरू मर्गज आदी कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी श्री. उपरकर पुढे म्हणाले, मनसेच्या स्थापनेपासून आपण पक्षाचे काम केले. जिल्ह्यात तळागाळापर्यंत तसेच आजच्या युवा पिढीपर्यंत पक्षाची ध्येय आणि धोरणे पोहचविण्यास पक्षासाठी आपण झोकून काम केले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. परंतु पक्षाकडून मागील काही वर्षात आम्हाला पूर्णतः दुर्लक्षित ठेवण्यात आले. जे सक्रिय कार्यकर्ते होते त्यांच्यावर केवळ द्वेषा पोटी पक्ष निरीक्षकांनी कारवाई केली. निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचे काम पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केले. पक्षात मनमानी कारभार सुरू असून ही आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. ते पुढे म्हणाले, राज्यात सत्तेत असलेल्या पक्षात आम्ही प्रवेश करू. परंतु या संदर्भात माझे निष्ठावान कार्यकर्ते जे सांगतील त्या पक्षात प्रवेश होईल. जिल्ह्यातील लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेत जाऊन काम करणे आवश्यक आहे. येत्या १५ दिवसात याबाबत निर्णय होईल. आम्ही मनसेवर आता कोणतीही टीका करणार नाही. मनसेने जनतेची कामे करावीत आणि आपला पक्ष वाढवावा. मात्र, आता आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत. जे निरीक्षक येत आहेत त्यांनी आता आमच्यावर टीकाटिप्पणी करू नये. आम्ही तुमच्यासोबत फारकत घेतली आहे. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला दम भरल्यास माझे कार्यकर्ते समर्थ असतील. मुख्य म्हणजे काही पक्षातील कार्यकर्ते सुद्धा आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =