You are currently viewing मळगाव-भूतनाथ जत्रोत्सव आज

मळगाव-भूतनाथ जत्रोत्सव आज

मळगाव-सोनुर्ली गावचे दशावतारी कलाकार सादर संयुक्त नाट्यप्रयोग

सावंतवाडी
मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून हा जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात धार्मिक विधी, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या गजरात तरंगासहीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री मळगाव व सोनुर्ली गावच्या प्रसिध्द दशावतारी कलाकरांचा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगात संजय जोशी, नारायण आसयेकर, नितीन आसयेकर, रत्नाकर मांजरेकर, प्रथमेश मळगावकर, रमेश शिरोडकर, संतोष गावकर, मुकुंद परब, चेतन राऊत, साईल तळकटकर, शुभम देऊलकर, ओंकार नवार, रामचंद्र शेटकर, खेमराज पोपकर, अनंत ठाकूर, साहील गावकर आदी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर त्यांना हार्मोनियम-संजय पालकर, पखवाज-निलेश मांजरेकर, तालरक्षक- समीर मांजरेकर संगीतसाथ करणार आहेत. भाविकांनी जत्रोत्सवाचा व संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा