You are currently viewing आई शारदा

आई शारदा

*लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या प्रशासिका लेखिका कवयित्री सौ.भारती भाईक लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आई शारदा*

 

आई शारदेच्या चरणी

गवसे मज शब्दांचं गाव

विहरते शारदा अविरत इथे

साहित्यनगरी जिचे नाव

 

रुणझुणत येतात शब्द

नर्तनातही ते रमतात

आत्ममग्न होऊनी सदा

शब्दशब्द सांडतात

 

मोहक, मोहमयी लाघव

गवसले मज इथे

आई शारदा बैसलेली

राजहंसावरी जिथे

 

फुंकर घालते हळूवार

पेटत्या मम वेदनेवरी

शीतल शारद चांदणं

फुलतं तिच्या मुखावरी

 

न सोडावा हात माझा

कायम हाती वसावा

आमरण रमूदे इथे

वरद शिरी असावा

 

सौ. भारती भाईक

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 5 =