You are currently viewing स्मृति भाग ४२

स्मृति भाग ४२

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्य भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ४२*

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

गृहस्थ धर्माचे दैवी आचरण करत असतांना एखाद्या दाम्पत्यास सुरकुत्या पडल्या नसतील वा त्याचे केस पांढरे झाले नसतील , असं कसं शक्य आहे ? आणि म्हणून वानप्रस्थ धर्मात पहिलाच श्लोक येतो , तो पहाण्यापूर्वी सहज आठवले म्हणून सांगतो . महाभारतात एक आई आहे पांडवांची . *कुंतीमाता* . तिचं चरित्र जरि अभ्यासलं तरी कळावं . आधीच दत्तक पुत्री ! इथूनच सुरु होते संकटांची मालिका तिच्या आयुष्यात ! पण वडिलांवर रोष नाही , नवर्‍याला दोष नाही , भीष्मांवर सासरे म्हणून राग नाही , जाऊ म्हणून गांधारीचाही राग नाही !!!! असं वागू शकतील सासूसुना , नणंदाभावजाया , जावाजावा ! यांचे शब्द तर बुलेटसारखे घुसतात काळजात एकमेकींच्या ना !!! ठीक आहे , पण युधिष्ठिराला राज्य मिळाल्यावर पुन्हा धृतराष्ट्र आणि गांधारीसह वानप्रस्थाश्रम स्वीकारला ! म्हणजे स्वतःचे आयुष्याचे शेवटीसुध्दा ज्यांनी आयुष्यभर तिच्या मुलांचे मृत्युसाठी प्रचंड कारस्थानं केली त्या आंधळ्यांची जबाबदारी !! केवढा त्याग !! आजच्या स्त्रीचे विचार केवढे थिटे वाटतात ना !! सामंजस्य व जुळवण्याची प्रवृत्ती असेल तर ताडनाची गरजच उरत नाही !! आता पुढील काही श्लोक पाहू .

!

*गृहस्थस्तु सदा पश्येद्वलीपलितमात्मनः ।*

*अपत्यस्यैव चापत्यं तदाSरण्यं समाश्रयेत् ॥*

गृहस्थाने आपला चेहरा सुरकुत्यांनी व्याप्त झाला आहे , केस पांढरे झाले आहेत , असे पाहिले व पुत्रास पुत्र उत्पन्न झाला की वनाचा आश्रय करावा .

 

*पुत्रेषु दारान्निक्षिप्य तथा वाSनुमती वनम् ।*

*अग्नीनुपचरेन्नित्यं वन्यमाहारमाहरेत् ॥*

आपल्या पत्नीस पुत्रांचे स्वाधीन करुन वा तिला सोबत घेवून वनात निघून जावे . नित्य अग्नीची सेवा करत भोजनासाठी वन्य आहारास घ्यावे .

वानप्रस्थी जनांची आचार विचार उच्चाराची आचार संहिताच असते . आमच्या पूर्वजांनी असे वानप्रस्थ केले म्हणून आज भारतातील वनवासी बांधव सुध्दा नियम पाळतांना दिसतात . सध्याची परिस्थिती ही की , मांडीवर नातु आणि तोंडाने विनोदाचे आविर्भावात ” हं हं हं आमचे वानप्रस्थ सुरु आहे आता ! ” अर्थहीन वैचारिक कृती ! ही माणसं नातवांनासुध्दा संस्कार द्यायला सक्षम नाहीत !! संस्कृति प्रसार आणि विस्तार कसा होईल ? मी धर्म शब्द वापरत नाही बरं !! मग एखादा कोरोना येतो व संस्कृति शिकवतो ! जो ऐकत नाही त्याला घेवून जातो !! पुन्हा आज सिमेंटची जंगले दिसतात सगळीकडे ( शहरे ) !!! वनेही नाही आणि उपवनेही नाही !!! मग करा कायदा , बागेसाठी जागा सोडावी !!! पण या सर्व गोष्टींना जबाबदार सरकारच !!! ज्यांनी रस्ते बांधले त्यांनी झाडे दुतर्फाची तोडली !! पण पुन्हा लावण्याचे काम त्या रस्त्याचे काम घेणार्‍या माणसांवर कधीच सोपवले गेले नाही ??? फक्त खाण्याची आणि खिसे भरण्याची प्रवृत्ती !! मग अवलाद निपजते आसुरी गुणप्रवृत्तीची !! आज सांभाळणे व तक्रारही निरर्थक झाली आहे ! असो .

बाकी स्मृति अपूर्ण नको रहायला !! आज थांबतो . विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा