You are currently viewing महिलांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी रुग्ण हक्क परिषद निर्धाराने लढा देईल- उमेश चव्हाण

महिलांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी रुग्ण हक्क परिषद निर्धाराने लढा देईल- उमेश चव्हाण

पिंपरी चिंचवड-

सद्यपरिस्थितीत महिला प्रचंड प्रमाणात मोठ्या आजारांना तोंड देत आहेत. मानसिक ताण – तणाव आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे विविध अवयवांना कँसर, किडनी निकामी होणे, ह्रुदयविकार यामुळे अनेक महिलांना केवळ उपचारांसाठी पैसे नाहीत म्हणून वयाच्या अवघ्या तीशीत- पन्नाशीतच महिलांना म्रुत्युला सामोरे जावे लागत आहे. ज्यांच्याजवळ लाखो रुपये आहेत त्यांनाच जगायचा अधिकार आहे का? यापुढे गरीब महिलांना औषधोपचार घ्यायला, हॉस्पीटलची लाखो रुपयांची बिले भरायला पैसे नाहीत म्हणून म्रुत्युला सामोरे जावे लागणार नाही. महिलांना हॉस्पीटल मध्ये लाखो रुपयांचे मोफत उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही निर्धाराने लढा देवू, असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
रूग्ण हक्क परिषद पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडीची बैठक शुक्रवारी पार पडली, यावेळी उमेश चव्हाण बोलत होते. यावेळी मंचावर उमेश चव्हाण, केंद्रीय सचिव दीपक पवार, केंद्रीय सल्लागार प्राचार्य वृन्दा हजारे, पूणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठये, पूणे जिल्हा प्रभारी गिरीष घाग, जिल्हा सरचिटणीस सुनंदा चव्हाण, हेमलता खेडकर, योगीता थेऊरकर, गीता साका, सुषमा लोंढे, मीना शिंदे उपस्थित होत्या.
यावेळी महिलांना होणाऱ्या आजार- रोगांवर उपचारासाठी करावी लागणारी कसरत, पैसा उभा करताना होणारे अपमान, अवहेलना आणि स्वतःच्या कुटुंबाचे दुर्लक्ष आणि या कारणामुळे होणारे म्रुत्यु स्त्रीला सामजिक द्रुष्टीने कमजोर करीत आहेत, असे मत सहभागी वक्त्यांनी व्यक्त केले.
”पीएमएफ”च्या महिला आरोग्य सर्वेक्षण माध्यमातून महिलांना होणाऱ्या असाध्य आणि दुर्धर रोगांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी रूग्ण हक्क परिषद लढत राहिल, असे उमेश चव्हाण म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 14 =