You are currently viewing १७ ते १९ फेब्रुवारी कालावधीत ऐतिहासिक नाट्य महोत्सवाचे आयोजन

१७ ते १९ फेब्रुवारी कालावधीत ऐतिहासिक नाट्य महोत्सवाचे आयोजन

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पहिल्यांदाच ऐतिहासिक नाट्य महोत्सव

 

सावंतवाडी :

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या नाट्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे. यात १७ तारखेला रात्री ८ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर “रायगडाला जेव्हा जाग येते” हा नाट्य प्रयोग होणार आहे. त्यानंतर १८ तारखेला रात्री ८ वाजता “इथे ओशाळला मृत्यू” हे नाट्य सादर करण्या येणार आहे. तर १९ तारखेला “शिवपूजन व सांगता सोहळा” होणार आहे. त्यानंतर “नरसिंह शिवराय” हे नाट्य सादर करण्यात येणार आहे.

ना. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ आणि मातृभूमी शिक्षण संस्थेच्या शिवसंस्कार यांच्या माध्यमातून सावंतवाडीत पहिल्यांदाच ऐतिहासिक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू आणि नरसिंह शिवराय ही तीन ऐतिहासिक नाटके सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.

सावंतवाडी येथील मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मातृभूमी शिक्षण संस्थेच्या प्रमुख डॉ. सोनल लेले, कलाकार मिलिंद कासार, भरत गावडे आदी उपस्थित होते.

या महोत्सवात मोफत प्रवेश असणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त शिवप्रेमींनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन शिवसंस्कारच्या प्रमुख डॉ. सोेनल लेले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा