You are currently viewing लोरे येथे लागलेल्या आगीत घर जळून खाक 

लोरे येथे लागलेल्या आगीत घर जळून खाक 

लोरे येथे लागलेल्या आगीत घर जळून खाक

वैभववाडी

लोरे नं.२ सुतारवाडी येथे ऊसाला लागलेल्या आगीत अशोक शंकर चव्हाण यांचे घर जळून खाक झाले आहे. त्यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी २ वा. सुमारास घडली.

अशोक चव्हाण यांचे लोरे सुतारवाडी येथे राहाते घर आहे. त्यांची तब्बेत बरी नसल्यामुळे ते मुंबईला गेले आहेत. त्यांचा मुलगा नोकरी निमित्त शिरगाव ता.देवगड येथे राहातो. त्यामुळे सध्या घर बंद होते. बुधवारी दुपारी सुतारवाडी येथील ऊसाच्या शेतीला अचानक लाग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु दुपारचे ऊन व सुटलेला वारा यामुळे आगीने उग्ररुप धारण केले. आग ऊस शेती नजीक अशोक चव्हाण यांच्या बंद घराला लागली. आग विझविण्यासाठी सुतारवाडीसह गावातील सुमारे १०० ग्रामस्थांनी प्रयत्न केले. माञ आगीच्या उग्ररुपाने घर जळुन खाक झाले. या आगीत घरातील संसारोपयोगी साहीत्यासह अन्नधान्यही जळून खाक झाले आहे. आगीची घटना समताच सरपंच विलास नावळे, तलाठी बागल, ग्रामसेवक श्री कांबळे, पोलिस पाटील लहु रावराणे, ग्रा.पं.सदस्य रितेश सुतार यांनी घटनेचा पंचनामा केला असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ३ लाखाचे नुकसान झाल्याचे नमुद केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा