You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांना पितृशोक

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांना पितृशोक

निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती जाधव यांचे निधन

कलमठ येथे आज दुपारी होणार अंत्यसंस्कार

कणकवली –

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांचे वडील मारुती सुबराव जाधव (69) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेमधून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले होते. वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ या तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द महत्वाची ठरली होती. कलमठ गुरववाडी निवस्थानी अंत्यदर्शन झाल्यानंतर कलमठ गावडेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 7 =