*यशवंतराव भोंसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय सावंतवाडी आयोजित सहावी राष्ट्रीय स्तरावरील परिषद यशस्वीरित्या संपन्न …!!!*
सावंतवाडी
यशवंतराव भोसले औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय सावंतवाडी आणि इंडियन फार्मासिटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी भोसले शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न झाली . यावेळी परिषदेचा विषय औषध निर्माण शास्त्र मधील वर्तमान दृष्टीकोन आणि संभाव्यता हा होता. या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय औषध निर्माण शास्त्र व व्यवसायाबरोबर निगडित संघटना म्हणजेच इंडियन फार्मासिटिकल असोसिएशन आयपीए महाराष्ट्र राज्य शाखा ही संलग्न असल्यामुळे भारतातील विविध राज्यांमधून भित्ति पत्रकांचे सादरीकरण करण्यात आले. सदर परिषद दोन सत्रात विभागण्यात आली होती प्रथम सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी लिमिटेड चे माजी कार्यकारी उपाध्यक्ष जागतिक गुणवत्ता प्रमुख श्री. गणाधीश कामत यांनी फार्मासिटिकल कंपनीमध्ये गुणवत्ता प्रणालीचा विकास कसा कसा करता येईल आणि त्यासाठी सिक्स सिग्मा यांसारख्या सांख्यिकी प्रक्रियांचा उपयोग कसा करावा यांविषयी विवेचन केले. प्रथम सत्राच्या उत्तरार्धात डॉक्टर आनंद महाजन( गोवा शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक ) लिक्विड क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोमेट्री या तंत्राचा उपयोग इम्प्युरीटी प्रोफाइलिंग (अशुद्धतेचे वर्णन ) करण्यासाठी कसा होतो याचे महत्व विशद केले.
भोजनानंतरच्या सत्रात शोधनिबंधपर भित्तीपत्रकांचे सादरीकरण करण्यात आले होते. यामधे विविध महाविद्यालयातून आलेल्या भित्तीपत्रकांचे पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी सह विद्यावाचस्पती या विभागांत वर्गीकरण करण्यात आले होते.
सदर शोधनिबंधांचे निरीक्षण करून त्यांतील उत्कृष्ठ सादरीकरणाला प्रमाणपत्र, विजयचिन्ह सह रोख बक्षीस देण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक रु. २५००- ओम प्रकाश दाभोळकर (यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी) ), व्दितीय पारितोषिक रु. २०००- कालोजी पुरुषोत्तम(यशवंतराव भोंसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय सावंतवाडी) , तृतीय पारितोषिक रु१५००- मोहिनी तावडे(डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ पुणे), चतुर्थ पारितोषिक रु. १०००- ओमकार सूर्यवंशी (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी),पंचम पारितोषिक रु. ७५० अथर्व परब(यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ डी. फार्मसी, सावंतवाडी) तर उत्तेजनार्थ प्रमाणपत्र पारितोषिक चे मानकरी सालस कामत, (यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी) मंथन सावंत (यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ डी. फार्मसी, सावंतवाडी)ठरले.
सदर कार्यक्रमास संस्थचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंतभोंसले, कार्याध्यक्षा श्रीमती.अस्मिता सावंतभोसले, सचिव श्री. संजीव देसाई ,प्रशासक समन्वयक श्रीमती.सुनेत्रा पाठक,निवंधक श्री. प्रसाद महाले तसेच जनसंपर्क अधिकारी श्री. नितीन सांड्ये आवर्जून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी महाविलयाचे संयोजक आणि प्राचार्य डॉ. विजय जगताप , आयोजन सचिव डॉ. रोहन बारसे, सावंत क्लब समन्वयक डॉ. गौरव गोपाळ नाईक, आय. क्यू. ए. सी समन्वयक श्री.तुषार रुकारी तसेच इतर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विभागप्रमुख प्रा. गौरी भिवशेट यांनी केले.
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*