You are currently viewing काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांचा अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश

काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांचा अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश

मुंबई :

 

काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मंगळवारी अखेर मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई शहर अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

“आज माझ्या नवीन राजकीय कारकिर्दीची सुरुवात आहे,” असे चव्हाण यांनी आदल्या दिवशी पत्रकारांना सांगितले होते. भविष्यात राज्याच्या विकासासाठी सोबत येऊन आम्ही एकत्र काम करणार आहोत. देवेंद्र फडणवीस हे नेहमीच सकारात्मक राहिले, आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + three =