You are currently viewing सावंतवाडीत बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

सावंतवाडीत बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

सावंतवाडी

चराठा ग्रामपंचायत माजी सदस्य बावतीस फर्नांडिस आणि युवक काँग्रेस विधानसभा मतदार संघाचे माजी अध्यक्ष संतोष जोईल यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या प्रमुख उपस्थिती येथील राष्ट्रवादी कार्यालयात हा प्रवेश घेण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी तालुका कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा. श्री प्रवीण भाई भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री अमित सामंत, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कन्याळकर, विद्यार्थी सेल संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत, युवती जिल्हा कार्याध्यक्ष संपदा तुळसकर, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर देसाई, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बाबा खतीब, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नजीर भाई शेख, उद्योग व व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, सावंतवाडी शहाराध्यक्ष देवा टेमकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, युवक तालुकाध्यक्ष राजू धार पवार , पदवीधर सेल तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी , उद्योग व व्यापार विभाग तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, शफीक खान, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष अरुण जाधव, सुभाष कदम, मोहिनी देउलकर, कांचन मसुरकर, जहिरा ख्वाजा, आलिया पटेल, आसिफ खाजा, युनुस मुल्ला, इमरान शेख, गौस मुल्ला, कौस्तुभ नाईक, याकुब शैख, नियाज़ शैख, नितीन सातपुते, अभी पवार, प्रतिक नाईक, सूर्यकांत नाईक, दिलीप नाईक, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + eighteen =