You are currently viewing ति पे डी

ति पे डी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*

 

*ति पे डी*

 

गालावरच्या थेंबामधुनी रंग केतकी खुलतो आहे…

खळी पाहुनी थेंब बिचारा ओघळणेही भुलतो आहे!

 

काळे कुंतल डोईवरती कुरळे कुरळे भुरभुरणारे…

आणि तिपेडी वेणीवरती गजरा हलतो डुलतो आहे!

 

गव्हाळ कांती ओठ गुलाबी डौलदार ती चाल अशी की…

हिंदोळ्याने त्या चालीच्या झुमका कानी झुलतो आहे!

 

पायपीट ती उन्हात केली हंडाभर त्या पाण्यासाठी…

चालचालुनी थकली दमली श्वास उरी मग फुलतो आहे!

 

खेडोपाडी उन्हाळ्यातली दाहकता ही अशीच असते…

उलते सारे रान जसे ते तसाच जो तो उलतो आहे!

 

जयराम धोंगडे, नांदेड (९४२२५५३३६९)

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − eight =