आचरा
चिंदर गावठणवाडी येथील चांभार कोंड येथे ग्रामपंचायत चिंदर च्या माध्यमातून सर्व शासकीय कर्मचारी अधिकार यांनी एकत्र येत वाहणाऱ्या पाण्यात वनराई बंधारा श्रमदानातून घातला.यामुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यामुळे या परीसरातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून या भागातील चाळीस पन्नास घरांना तसेच लगतच्या शेतकरी बागायतदारांना फायदा होणार आहे.
विहीरीच्या पाण्याची पातळी उन्हाळ्यात घटत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. या दृष्टीने येथून वाहणाऱ्या पाण्यात येवढ्यातच बंधारा बांधल्यास विहीरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकेल या हेतूने चिंदर ग्रामपंचायत मार्फत शासकीय अधिकारी व कर्मचारी एकत्र करत श्रमदानातून बंधारा बांधण्याचा संकल्प केला,यावेळी चिंदर केंद्र शाळेचे सर्व शिक्षक आणि पंचायत समिती सायक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी श्याम चव्हाण, विस्तार कुषि अधिकारी संजय गोसावी, विस्तार अधिकारी पि डी जाधव, ग्रामपंचायत प्रशासक कांबळे, ग्रामविकास अधिकारी पि जी कदम, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगावर, रणजित दत्तदास, भास्कर पवार व शेतकरी वर्ग सहभागी झाले होते.