You are currently viewing १६ – १८ फेब्रुवारी रोजी श्री. सत्यवान रेडकर यांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

१६ – १८ फेब्रुवारी रोजी श्री. सत्यवान रेडकर यांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

मसुरे :

कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खालील वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धा परीक्षांसंदर्भात निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत. जवळपास २४० व्याख्यानांद्वारे त्यांच्या अमोघ वाणी व मार्गदर्शनाने प्रेरित होऊन असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळू लागले आहेत.

*शुक्रवार, १६.०२.२०२४*

सकाळी ८.३० वा., स.ह.केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवगड

सकाळी ११.३० वा, माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर, देवगड

 

*शनिवार, १७.०२.२०२४*

सकाळी ९.०० वा., एस.एल.देसाई विद्यालय, पाट, कुडाळ

दुपारी २.०० वाजता, रामेश्वर माध्यमिक विद्यालय, बांव, कुडाळ

 

*रविवार, १८.०२.२०२४*

सकाळी १०.०० वाजता, लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग

जास्तीत जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी व ३८ वयोगटातील खुल्या व ४३ वयोगटातील राखीव प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी या निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकणपुत्र, प्रेरणादायी व्याख्याते, प्रमुख मार्गदर्शक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा