You are currently viewing विरोधक काय बोलतायत काय करतात याच्याशी माझा संबंध नाही – निलेश राणे

विरोधक काय बोलतायत काय करतात याच्याशी माझा संबंध नाही – निलेश राणे

 

कुडाळ:

भाजपचे कुडाळ मालवण प्रमुख निलेश राणे यांनी कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की सध्या मी कुठेही आजूबाजूला बघत नाही विरोधक काय बोलतायत काय करतात याच्याशी माझा संबंध नाही सध्या मी कुडाळ व मालवण या गावांच्या सीमांत पूर्ती काम करत असून हे गाव मी फोकस केले आहेत निष्क्रिय आमदार वैभव नाईक यांच्या बद्दल काहीही बोलू शकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी सांगितले की गणेश चतुर्थी पूर्वी चाकरमान्यांसाठी महामार्ग सुस्थितीत करण्यात येईल यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नांना आमची साथ आहे असे त्यांनी सांगितले.

 

महामार्ग होणार सुखकर

 

महामार्गाचा प्रश्न ज्वलंत असला तरी यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे हा मार्ग गणेश चतुर्थी पूर्वी सुस्थितीत करण्यासाठी कार्यतत्पर आहेत. स्वतः महामार्गावर उतरून ते काम करून घेत आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे की पालकमंत्री रवींद्र चव्हाण जे हातात काम घेतात ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि त्यांना आमची ही साथ आहे कोणत्याही परिस्थितीत चाकरमान्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेणार आहोत.

 

शिंदे – फडणवीस सरकारचे केले अभिनंदन

 

गणेश चतुर्थी उत्सव कोकणातील सर्वात मोठा उत्सव आहे आणि या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात दाखल होतात या चाकरमान्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३८ एस. टी. बस सेवा या कालावधीत सोडणार असल्याचे सांगितले आहे कोकणवासीयांसाठी ही सेवा देणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन करीत असल्याचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी सांगितले.

 

रेल्वेतील तिकिटामधील काळाबाजार थांबला पाहिजे

 

उत्सवा दरम्यान कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्या काही क्षणात फुल झाल्याचे दाखविले जाते मुळात टिकटांमधील हा काळाबाजार या अगोदर आम्ही सांगितला होता हा काळाबाजार थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणेने काम करणे गरजेचे आहे अन्यथा काळाबाजार करणाऱ्यांवर आमच्या पद्धतीत कारवाई करावी लागेल असेही माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, उद्योजक विशाल परब, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, युवा मोर्चाचे अध्यक्ष रूपेश कानडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम तसेच नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा