You are currently viewing कला माणसाला जिवंत ठेवते

कला माणसाला जिवंत ठेवते

*कला माणसाला जिवंत ठेवते*

सोनाली कुलकर्णीः ‘एमआयटी एडीटी’च्या ‘पर्सोना फेस्ट’ला प्रारंभ

पुणेः

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबर कुठली तरी एक कला आत्मसात केली पाहिजे. कारण, कला ही माणसाला सामाजिकरित्या जिवंत ठेवते. कलेच्या सहवासामुळे खऱ्या अर्थाने माणूस घडतो आणि त्याला दैनंदिन कामाव्यतिरिक्त एक आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा व संधी प्राप्त होते, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मांडले.
ती एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सहाव्या ‘पर्सोना फेस्ट-२४’ च्या उद्घाटनात बोलत होती. याप्रसंगी, सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, एमआयटी ‘मिटकाॅम’च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.विरेंद्र शेटे, डाॅ.रजनीशकौर सचदेव-बेदी, डाॅ.नचिकेत ठाकूर, डाॅ.मिलिंद ढोबळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सोनालीने आपल्या आवाजात ‘शिववंदना’ सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये प्रचंड जोश संचरला होता. ती पुढे म्हणाली, महाविद्यालयीन जीवन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा काळ असतो. कारण याच काळात विद्यार्थ्याला खऱ्याअर्थाने त्याला नेमका रस कोणत्या क्षेत्रात आहे याची जाणीव होते. त्याचसाठी ‘पर्सोना’ सारखे फेस्ट विद्यार्थ्यांना त्यांच्यातील विविध कलागुणांचा साक्षात्कार होण्यासाठी व त्यांच्यातून प्रेरणा घेण्यासाठी महत्वाचे ठरतात.
अभिनेत्री रिंकूने यावेळी सैराट चित्रपटातील तिचा प्रसिद्ध डायलाॅग म्हणून उपस्थितांची मने जिंकली. यासह तिने विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन दिवसांचा भरभरून आनंद घेण्याचे आवाहन देखील केले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.डाॅ.कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांच्यातील कलाकार, गायक, चित्रकार, कवीच्या आदी आवडी-निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यामाध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ‘पर्सोना फेस्ट’चे दरवर्षी आयोजन केले जाते. ‘पर्सोना’सारख्या कलात्मक उत्सवांच्या माध्यमातूनच देशाच्या कला संस्कृतीत भर टाकण्याचे बाळकडू विद्यार्थ्यांना विद्यापीठीय जीवनात मिळते. त्याचमुळे एमआयटी शिक्षण संकुलातून पास होऊन बाहेर पडणारा विद्यार्थी सामाजिक जीवनात मोठे नाव कमावतो.
‘पर्सोना फेस्ट’साठी विश्वराजबागेचा कॅम्पस अतिशय सुंदरित्या सजविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पुढील चार दिवस चालणाऱ्या या कला उत्सवासाठी अभिनेता आदिनाथ कोठारे, अंकुश चौधरी व स्टाँडअप विनोदवीर गौरव कपूरसह अनेक सेलिब्रेटी विद्यापीठात हजेरी लावणार आहेत.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा