वैभववाडी :
महायुतीचे उमेदवार प्रमोद पुंडलिक रावराणे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबई या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. राज्य सहकारी पणन महासंघाची १९ सदस्यांसाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वसाधारण मतदार संघ कोकण विभागातून दोन जागांसाठी आ. जयंत प्रभाकर पाटील (महाविकास आघाडी) व प्रमोद पुंडलिक रावराणे (महायुती), श्री . व्हिक्टर डान्टस (महाविकास आघाडी), सुरेश खैरे (रायगड), मोहन अंधेरे (ठाणे), यांचे अर्ज प्राप्त झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. छाननी मध्ये व्हिक्टर डान्टस, सुरेश खैरे, मोहन अंधेरे यांचे उमेदवारी अर्ज अवैद्य ठरले. तर आमदार जयंत पाटील व श्री प्रमोद रावराणे यांचे अर्ज वैद्य ठरले. दोन जागांसाठी केवळ दोनच अर्ज प्रक्रियेत राहिले. आ. जयंत पाटील व प्रमोद रावराणे रा. एडगांव ता. वैभववाडी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. निवडीनंतर प्रमोद रावराणे यांचे महायुतीचे पदाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा पदाधिकारी व नागरिकांतून अभिनंदन केले जात आहे.
प्रमोद रावराणे हे भाजपाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. जिल्हा भाजपा उपाध्यक्ष पदावर ते सध्या कार्यरत आहेत. संघटना वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. पणन महासंघ ही महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे. संस्थेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळवून देऊन त्यांना मदत करणे हा आहे. महाराष्ट्र शासन व राज्यातील सर्व सहकारी संस्था प्रतिनिधी यांच्यातील प्रमुख दुवा म्हणून महासंघ काम करतो. नुतन संचालक प्रमोद रावराणे यांचे सर्व सहकारी संस्था प्रतिनिधी कडून अभिनंदन करण्यात येत आहे.