You are currently viewing स्मृति भाग ४१

स्मृति भाग ४१

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ४१*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

समग्र स्वाध्यायी बंधूंचे हृदयस्थ प.पू. दादाजींचे एक वाक्य आठवते , *” डोके उडवून क्रांती होत नाही तर डोके बदलवून क्रांती होते “* . मग आपल्या घरात आलेल्या मुलीचे समजूतीने मत परिवर्तन हळूहळू करत गेलात तर ताडन हा विषयच उरणार नाही ? आता पुढील अध्यायाकडे वळू . तो आहे *” पञ्चमहायज्ञाः गृहाश्रमिणां प्रशंसातिथीवर्णनञ्च “* . आता पुढील काही श्लोक पाहू .

 

*देवयज्ञो भूतयज्ञः पितृयज्ञस्तथैव च।*

*ब्रह्मयज्ञो नृयज्ञश्च पञ्च यज्ञाः प्रकीर्तिता ॥*

देवयज्ञ , भूतयज्ञ , पितृयज्ञ , ब्रह्मयज्ञ आणि नृयज्ञ हे पाच यज्ञ सांगितले आहेत .

होम करण्याने देवयज्ञ गणला जातो . भूतांना बळी देण्याने भूतयज्ञ होतो . ( इथे बळि देण्याचा अर्थ त्यांना खाण्यास देणे , उदरभरणाचे साधन देणे , असा आहे . पुस्तकातला स्थूल श्लोक जसा पुस्तकातच राहतो पण तो सूक्ष्म रुपाने आपल्या बुद्धित बसतो पाठांतरानंतर ! तीच गोष्ट बळी वा नैवेद्यासाठी समजावी . ) पितरांना पिण्ड देण्याने पितृयज्ञ होतो . ” स्वाध्यायो ब्रह्मयज्ञश्च ” म्हणजे स्वाध्याय करण्याने ब्रह्मयज्ञ होतो . तसा स्वाध्याय हा शब्द वेदाध्ययनासाठी वापरला गेला आहे . तरी सर्वसाधारण

🌷🍀🌷स्वाध्याय🍀🌷🍀

 

*उपासनेला दृढ चालवावे ।*

*भूदेव संतासि सदा नमावे।*

*सत्कर्मयोगे वय घालवावे ।*

*सर्वामुखी मंगल बोलवावे ।।*

☝अशा वागण्यासही स्वाध्यायच समजावे . कारण वेदाध्ययन हे आज प्रत्येकाला कितपत शक्य आहे ? शंकाच आहे !! पुढे अतिथीपूजेला वा आदरातिथ्याला नृयज्ञ समजले जाते . हे का करावे ? याची कारणमीमांसादेखिल ऋषिंनी दिलेली आहे . गृहस्थाचे घरात पाच वधस्थल आहेत . १)चुल्ली म्हणजे चूल , २)पेषणी म्हणजे चक्की वा जातं , ३)उपस्कर म्हणजे झाडू , ४)कण्डनी म्हणजे उखळ आणि ५) उदकुम्भ म्हणजे पाण्याचा घडा . खरं तर या पाच वस्तुंचा वापर करतांना माणसाचे हातून न कळत हत्या होत असते . आणि या पंचवधस्थलाचे मोबदल्यात पंचमहायज्ञ करावे , हे ऋषि सांगतात . संसार करणार्‍या दाम्पत्याचा संसार उत्तम , आरोग्यदायी व समृध्दतायुक्त चालण्यासाठी हे पंचमहायज्ञ !! हे ऋषिंचं कल्पना सौंदर्य आहे का कल्याणकारी शिकवण आहे ? पाळाल ना सगळेजण ? ऋषिंचे ऐकले तर आयुष्याचे कल्याणच आहे ! पुढे गृहस्थाची महती वर्णनात्मक एक श्लोक येतो —

*वानप्रस्थो ब्रह्मचारी यतिश्चैव तथा द्विजः ।*

*गृहस्थस्य प्रसादेन जीवन्त्येते यथाविधि ॥*

वानप्रस्थ , ब्रह्मचारी , सन्यासी व द्विज ( ब्राह्मण ) हे चार ही यथाविधी गृहस्थाचे कृपेने जीवित असतात .

कारण गृहस्थच यज्ञ करतो , तप करतो , व्रतवैकल्य करतो , दान करतो . इतःपर पुढील पाचसहा श्लोकांमधे नारी , राजा , ब्रह्मचारी , वानप्रस्थी , संन्यासी व गृहस्थ काय केल्याने वा कसे वागल्याने स्वर्गास प्राप्त करु शकतात म्हणजेच उत्तम सुखास वा आनंदास प्राप्त करु शकतात हे सांगितले आहे . याच अध्यायात द्विजाने शूद्राकडे ( संपत्तीने साधारण वा गरीब ) धनाची याचना करु नाही , तो जे देईल ते घ्यावे , ही सूचना देणारे ऋषि वा त्यांचे तत्वज्ञान टाकाऊ असेल का टिकाऊपणा आणणारे असेल ? हे प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर ठरवण्याची व त्यांनी सांगितले तसे आवर्जून वागण्याची वेळ आज येवून ठेपली आहे . इतर धर्मियांची सर्व प्रकारची धर्म—अर्थ आणि काम या तीनही बाबतीतली आक्रमणे पहाता प्रत्येकाला ” हिंदू ” म्हणून गर्वाने म्हणण्याची वेळ आली आहे !! हिंदूस्थानात जो रहातो तो हिंदूच ! आपण सारे एक आहोत , या भावनेने पुन्हा संघटीत होण्याची वेळ आली आहे ! राजकारण नको प्रत्येक बाबतीत ! कारण आमच्या गलिच्छ राजकारण्यांनी या सत्तर वर्षात बरीच भारतीय बलस्थाने उद्ध्वस्त करण्याचा प्रकार केला आहे . आज थांबतो . शुभदिनः ।

बाकी स्मृति अपूर्ण नको रहायला !! आज थांबतो . विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा