You are currently viewing संमेलन माझ्या नजरेतून..!

संमेलन माझ्या नजरेतून..!

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री योगिनी पैंठणकर लिखित अप्रतिम लेख*

 

*९७ वे मराठी साहित्य संमेलन ,अंमळनेर.*

 

*संमेलन माझ्या नजरेतून..!*

 

दोन-तीन आणि चार फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे साहित्य संमेलन झाले. खूप साऱ्या चर्चा वक्तव्य माहिती बातम्या सोशल माध्यम आणि वर्तमानपत्रातून वाचतोय. साहित्य हे प्रत्येक पिढीचे – दशकाचे प्राथमिक चित्र असते. संमेलनाचे अध्यक्ष श्री रवींद्र शोभणे हे होते त्यांचे विचार व एकंदरच कार्यक्रम कसे याची उत्सुकता मनात होतीच.

खरंतर मी स्वतः निमंत्रीत कवीत नव्हते ,पण संमेलन कसे आहे ,काय विषय आहेत, कसे सादरीकरण करतात हे बघायला मी गेले , हे माझ्या परिचयाचे गाव ! राहायची सोय असल्यामुळे आणि नातेवाईक तिथे राहत असल्याने मला अगदी सोयीचं होतं. तरीपण पारोळ्या हून जाताना जरा त्रासच झाला. सुरुवात इथूनच झाली. रिक्षावाल्यांना माझ्या बोलण्यावरून ,फोनच्या संभाषणावरून कळले की इथे काहीतरी मोठा प्रोग्राम आहे. रिक्षातले -कॉलेजची मुलगी मलाच विचारत होती तुम्ही कुठे चालले आहात? आम्हाला कंपल्सरी केला आहे -तिथे काय असतं? कार्यक्रमात कसा सहभाग घ्यायचा? मी माझ्या परीने तिला उत्तरे दिली. कार्यक्रम वेळेवर सुरू झाला .सर्व भाषणं, त्यानंतर आठ नऊ राजकारणी नेते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उद्घाटन ,दिंडी सर्व काही व्यवस्थित झाले. आणि आम्ही गेलो तर खरंच जे पाहिले त्याचं आश्चर्य वाटलं. मागच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. खूप लोक छान गप्पा मारत उन्हात बसले होते. मी वाट काढून थोडीशी जवळ गेले आणि सुमित्रा महाराजांचे संपूर्ण भाषण जवळून ऐकलं त्यांनी बऱ्याच राजकारणाचे मस्तपैकी कान टोचले.

सगळीकडे खानदेशी भाषा अधिक प्रमाणात ऐकू येत‌ होती, जी मला अजिबातच कळत नव्हती. आम्ही प्रत्येक दालन, साने गुरुजींची खोली, तेथील सगळी माहिती ,फोटो काढून पुस्तक प्रकाशकांचे स्टौल सारे बघायला गेलो .फारसे लोक नव्हतेच .क्वचित एखाद दूसरा वाचक. जवळजवळ पुस्तकं बघतच चालत होते, विकत घेत नव्हतेच. लेखक मात्र वाचकांची देवासारखी वाट बघण्यात मग्न होते. एवढा खर्च करून ही माणसे पुस्तक आणतात, पण ती कोणीच का घेत नाही? घेतली तरी वाचत का नाही ? मी स्वतः काही मुलांसाठी पुस्तक घेतली. नंतर कवितेच्या सादरीकरणात ज्यांच्या कविता होता त्या भगिनी व काही पुरुष खूप रिकाम्या खुर्च्या आणि एक 82 वर्षाचे गृहस्थ व इतर थोडासा सावळा गोंधळ चालू होता .कविता झाल्यावर सगळेजण आपापले सर्टिफिकेट घेऊन निघून जात होते. मग तिथून आम्ही जनरल एक चक्कर मारला. एका नाट्याने व अनेक तृतीयपंथीयांच्या विषयाने सर्वांची मने जिंकली. मला काही कारणास्तव लवकर निघावे लागले. कदाचित इतर कार्यक्रम छान झाले असतीलही. पण to be Frank कदाचित माझ्या गावाचे म्हणून यापेक्षा मागील वर्षीचे नाशिकचे संमेलन जास्त दिमाख दार , नियोजनबद्ध आणि व्यवस्थित झाले असे वाटते.

परिसंवाद ,काही विषय, कथाकथन ,कविता न,वीन विचार या संमेलनात यायला हवेत. बेकारीचा प्रश्न महत्त्वाचा होता. तो दिसला नाही .काही सकस विषयही हवे. शेतकरी आत्महत्येचा विषय कुठेही नव्हता .आजचे विद्रोही उद्याचे प्रस्थापित असतात. उमेश काटे यांचे सूत्रसंचालन छान होते. विनोदी दालनही छान होते.. काही ठिकाणी प्रत्येक लेखकाचे व्यंगचित्र काढून त्यांची माहिती दिलेली होती. ती विशेषतः मला आवडली .विनोद जर चांगल्या अंगाने मांडला तर नक्की टिकून राहतो असं माझ मत आहे. मात्र त्या तुलनेत शेतकऱ्यांचे प्रश्न होते कृषी प्रधान गावात ते असू नये ,फारसे कुठे मांडले गेले नाही हा प्रश्न माझ्या मनात सतत डोकावत होता. काही कार्टून्स त्यावरचे लेखन, बाहेर असलेले पोस्टर, साने गुरुजींचे विचार खरच खूप छान होते. एकंदरीत वाचकांना, समाजातील तरुण वर्गाला आणि आमच्यासारख्या नवीन साहित्यीकांना जोडणारे हे साहित्य नगरी येथील साने “गुरुजींचे खरा तो एकची धर्माची” शिकवण घडवणारे संमेलन माझ्यासाठी लक्षवेधी ठरले. फक्त मनात एकच विचार होता भाषणाच्या वेळी एवढ्या रिकाम्या खुर्च्या कदाचित कुसुमाग्रज ठोंबरे किंवा इतर कुठल्याही लेखकाला तिथे असताना बघवल्या गेल्या नसत्या .सध्या तरी मराठी साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. पण ती वाचणारे तरुण पिढीही निश्चित हवी असं आशावाद मनात ठेवून मी तेथून निघाले. आमचे नातेवाईक तेथे असल्यामुळे मला तरी काही प्रश्न आला नाही. परंतु काही ठिकाणी राहण्याची, निवासाची,अन्नाची पाण्याची बरीच व्यवस्था ढसाळ होते याबद्दलही थोडीशी खंत व्यक्त करते.तरूण पीढी स्वतः हून तेथे यायला हवी होती असे वाटुन गेले.

यातील शेवटचे वाक्य *”माझी काळी आई काळ्या मातीतच राबली नी अंती तिचीही माती झाली*” या विधानाने डोळे पाणावले. माझ्या साहित्य संपदा तील काही मैत्रिणींना भेटून, छोटा डबा- खाऊ, वाण देऊन मी त्यांचा निरोप घेऊन निघालेही. पुढील साहित्याच्या प्रवासाच्या प्रतीक्षेत……….. पुढील संमेलनास खुप शुभेच्छा…….व अभिनंदन ही!

 

लेखन. ©®. सौ योगिनी वसंत पैठणकर. भाभानगर. नाशिक.

प्रतिक्रिया व्यक्त करा