You are currently viewing सावंतवाडीत उद्यापासून “महासंस्कृती महोत्सव”…

सावंतवाडीत उद्यापासून “महासंस्कृती महोत्सव”…

सावंतवाडीत उद्यापासून “महासंस्कृती महोत्सव”…

शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे आयोजन..

सावंतवाडी

शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महासंस्कृती महोत्सव’ राज्यभर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर ऐतिहासिक सावंतवाडी शहरात ६ ते १० फेब्रुवारी पर्यंत ‘महासंस्कृती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. उद्या मंगळवारी महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी, बुधवारी महाराष्ट्राची संस्कृती, गुरुवारी महानाट्य शिवबा, शुक्रवारी मराठी बाणा व शेवटच्या दिवशी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेंच्या सुरेल संगीत रजनीची मेजवानी सावंतवाडीकरांसह जिल्हावासियांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

येथील डॉ. स्वार हॉस्पीटल समोरील जिमखाना मैदान येथे उद्या ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. ह्या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ठीक ६ वाजता होणार आहे. या महोत्सवाला केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, वैभव नाईक, नितेश राणे आणि विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेचे विविध प्रकार, सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रदर्शनीय कलादालन ज्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, पर्यटन विषयक दालन, कृषिविषयक उत्पादन दालन, हस्तकला प्रदर्शन (बांबुकाम) दालन, बचत गट पदार्थ व उत्पादन दालन, आपत्ती विषयक दालनांचा समावेश असणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम सायं. ६ ते रात्री १० पर्यंत होणार असून ६ फेब्रुवारी महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी, ७ फेब्रुवारी जल्लोष सिंधुदुर्ग, ८ फेब्रुवारी महानाट्य शिवबा, ९ फेब्रुवारी मराठी बाणा व १० फेब्रुवारीला अवधूत गुप्ते संगीत रजनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा