You are currently viewing नांदगाव येथे कार व रिक्षा मध्ये अपघात

नांदगाव येथे कार व रिक्षा मध्ये अपघात

नांदगाव येथे कार व रिक्षा मध्ये अपघात

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव कोळंबा मंदिर समोर नांदगावहून मुंबईकडे जाणा-या मार्गावर चारचाकी कार व रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.या अपघातात रिक्षातील‌ एक प्रवासी गंभीर जखमी झाला. रिक्षाचालकास किरकोळ दुखापत झाली आहे.तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले .हा अपघात सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडला.

आपल्या ताब्यातील जीप कॅम्पस ही कार घेऊन अथांग योगेंद्र सामंत,( वय २८, रा.गंगापूर रोड, नाशिक) हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना याच मार्गावर विरूद्ध दिशेने रिक्षा चालक श्री.मामुद अमीर काझी, (रा.असलदे शिवाजी नगर) हे नांदगाव येथून प्रवाशी कु.रोशन किरण गमरे,(मूळ रा.भायखळा मुंबई, सध्या नांदगाव) याला घेऊन जात असताना दोन्ही वाहनांची धडक होत अपघात घडला.

या अपघातानंतर नागरीकांनी तात्काळ जखमी रिक्षा चालक व जखमी प्रवाशी याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी कणकवली उप पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शेडगे, किरण कदम,चंद्रकांत माने, एम.व्ही. गुरव यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.यावेळी सरपंच रविराज मोरजकर व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा