इंद्रायणीनगर, भोसरी- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
श्री टागोर शिक्षण संस्थेचे श्री टागोर माध्यमिक विद्यालय इंद्रायणी नगर भोसरी पुणे 26 या विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023- 24 या वर्षांमध्ये विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीचे एकूण 50 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.
या परीक्षेमध्ये विद्यालयाचे ए ग्रेडमध्ये कृष्णा दिलीप पाटील, प्रेम संजय सोनार हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बी ग्रेडमध्ये स्नेहल पाटील श्वेता कदम, अक्षदा साठे, श्रेया पैठणकर, केतकी गोळे, मोनाली जाधव, साक्षी कांबळे, नवीन शिंदे, सोहम कबाडी, योगेश जाधव, तेजस्विनी जाधव, श्रीजी पवार, राधिका कुंभार, प्रियंका असलकर, पूनम लाळगे असे एकूण 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सी ग्रेड मध्ये एकूण वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या या इंटरमिजिएट परीक्षेमुळे इयत्ता दहावीच्या एस .एस .सी बोर्ड परीक्षेमध्ये या निकालाचा मोठा फायदा त्यांना टक्केवारीत होणार आहे.
श्री टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे चेअरमन श्री नंदकुमार लांडे पाटील व उपाध्यक्ष महेश घावटे, संस्थेचे सचिव सुरेश फलके, युवराज बापू लांडे, सुरज लांडे, स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज लांडे, दत्तोबा लांडे या मान्यवरांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे सहशिक्षक श्री सतीश क्षीरसागर यांचे मोलाचे अध्यापन, मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील सहशिक्षक यांनी देखील खूप कष्ट केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापक श्री हनुमंत आगे व संतोष काळे यांनी अभिनंदन केले.