You are currently viewing महाराष्ट्रातील उरली सुरली आघाडी….महाआघाडी

महाराष्ट्रातील उरली सुरली आघाडी….महाआघाडी

 

‘लोकमान्य पुरस्कार 2023’चा राष्ट्रीय पुरस्कार मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला. आणि लगेच महाराष्ट्रातील उरली सुरली महाआघाडी म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेचा उरलेला बचत गट, शरद पवारांचा उरलेला बचतगट अशी ती आघाडी…… नाही महाआघाडी. यांच्या डोक्यात निदर्शनाचा किडा शिरला आणि संपूर्ण पुण्यातून निदर्शने 1 ऑगस्ट 2023 रोजी दाखविण्यात आली. त्यातून शरद पवारगट वगळण्यात आला अर्थातच, शरद पवार या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. आणि हा सत्कार त्यांच्याच हस्ते होणार होता. व्यासपीठावर( कि रंगमंचावर?) मोदींसह शरद पवार, देवेंद्र, एकनाथ शिंदे, अजितदादा, सुशीलकुमार, दीपक टिळक मान्यवर उपस्थित होते. काँगेस राज्यात म्हणा किंवा देशात म्हणा, मोदींचा कार्यक्रम म्हंटला कि निदर्शने आलीच आता विरोधी पक्षांना निदर्शने आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हेच त्यांच्या अजेंड्यावर दोन कार्यक्रम उरले आहेत.विरोधी पक्षांकडे लोकसभेत किंवा विधानसभेत असे नेतेच उरले नाहीत कि जे आपल्या मुद्यावर ठाम राहून सभेत विषय चर्चेला घेतील… किंवा बाकीच्यांना विचार करायला लावतील… असो…

महाआघाडीने निदर्शने केलीत ती पवारांनी यां सभेत सहभागी होऊ नये. आणि व्यासपीठावर बसू नये हा त्या मागील उद्धेश होता. परंतु पुरस्कार समितीस ह्या पुरस्कारासाठी नाव नरेंद्र मोदींचे सुचवले ते स्वतः शरद पवारच होते. आणि मग समितीने त्यांनाच मोदीजींना सांगण्यास सांगितले आणि पुरस्कार शरद पवारांच्याच हस्ते देण्याचे ठरविण्यात आले. हा कार्यक्रम 3 महिने अगोदर ठरविण्यात आला होता.. शरदपवारांना विरोध केला पण मग काँग्रेचे ज्येष्ठ नेते मा. सुशीलकुमार शिंदे हे पण होते कि, व्यासपीठावर. काँग्रेस चे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्य मंत्री अशी अनेक पदे ज्यांनी विभुषीत केली आहेत, असे सुशील कुमार शिंदे साठी का ही निदर्शने नव्हती? ते दिसलें नाहीत का महाआघाडी ला त्यांना नाहीतर नाहीत सोशल मीडिया ला पण दिसलें नाहीत का? सोशल मीडियाने पवारांना विचारले आणि नेहमी प्रमाणे पळवाट शोधत पवारांनी उत्तर दिलेच. कि हा राजकीय कार्यक्रम नाही किंवा भा जप चा कार्यक्रम नाही. हा एक सामाजिक संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. म्हणून यां कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. अर्थात हा प्रश्न जर सुशिलकुमारांना विचारला गेला असता तर त्यांनी हेच उत्तर दिले असते म्हणजे हीच पळवट शोधली असती… आजकाल नेते आणि प्रवक्ते मग ते कोणत्याही पक्षाचे असोत हे पळवाटा च शोधत असतात. आणि अशा पळवाटा शोधणाऱ्या व्यक्तीलाच नेता म्हणतात किंवा प्रवक्ता म्हणतात कही दिवसांनी हीच व्याख्या ठरेलं.

एखादा वक्ता, प्रवक्ता नेता याची नियुक्ती पक्ष का करतो. तर पक्षाची उद्धिषठे, चांगला ले वाईट धोरणे, कुठे काय बोलावे काय बोलू नये इत्यादी त्यांना पक्षीय कार्यकर्त्यांना किंवा विरोधकांशी बोलताना ठाम पणे विचार सांगता आले पाहिजेत किंवा मांडता आले पाहिजेत. पण अलीकडे काय झाले आहे. नेता प्रवक्ता यांना च काय विषय मांडायचा ते समजत नाही ( संजय राउता ना कधीच समजले नाही आपण काय बोलत आहोत. म्हणतात णा “उथळ पाण्याला खळखळाट फार ” पण आता उथळ पाणी पण नाही राहिले….असो. प्रश्न असा आहे कि सुशिलकुमारांनी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांना वेळीच आवर का घातला नाही. ते जेष्ठ आणि श्रेष्ठ, एकनिष्ठ होते ना मग त्यांनी बकऱ्या कर्त्यांना राजकीय कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम यातील फरक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगायला हवा होता. ते त्यांनी केले नाही. सोशल माध्यमानी पण त्यांना काही विचारले नाही.असो.

नुकतीच कही दिवसांपूर्वी सर्व पक्षीय नेत्यांची म्हणजे सव्हिस पक्षांची बैठक बंगलोर ळा झाली त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. म्हणून त्यांनी उपस्थित राहू नये असेही म्हणणे उरल्या सुरल्या महा विकास आघाडीचे होते.

यात अजून एक खटकलेला मुद्दा म्हणजे बाबा आढाव हे पण निर्देशन करणाऱ्या ताफयात हजर होते…..19 77 साली ज्यावेळी इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी जाहीर केली होती (त्यावेळी मी काँग्रेसची लहान का असेना मी एक कार्यकरती होती )त्या वेळी बाबा आढाव ह्यांनी पुण्यात जनता दला च्या बरोबरीने त्यांच्यात सामील हॊहून निदर्शने केली होती. आणि आज 50 वर्षांनी मोदीं च्या विरोधात काँग्रेस कडून उभे राहून निदर्शने करीत होते. यास काय म्हणायचे. तुम्हाला इंदिराजी नको आणि मोदी पण नको, मग तुम्हाला काय हवे ते तरी लोकांना सांगा. तुमचा स्वतःचा कही अजेंडा आहे का तो लोकांना समोर आणा आणि लोकांना पटवून ध्य तुमचा मुद्दा तर ती पण हिंमत नाही का?

काही वर्षांपूर्वी

पुण्यात म्हणजे बहुदा पिंपरी चिंचवड मध्ये एक राष्ट्रवादीची सभा होती शरद पवार अर्थातच हजर होते.त्यावेळी नेहमीच्या परंपरे नुसार पुणेरी पगडी आणण्यात आली त्यावेळी शरद पवारांनी त्याला विरोध करून फुले जे पागोटे घालत तसें पागोटे मागवले आणि ते घालून अध्यक्षीय भाषण केले. आणि ही फुलेंची पण पुण्य नगरी असून यां पुढे पुणेरी पागोटे च घालावे असे सांगितले नव्हे हुकूमच काढला. मग यां सभेत त्यांनी संयोजकांना का नाही सांगितले नरेंद्र मोदी सोडून बाकी च्यांना पागोटे घाला म्हणून? नरेंद्र मोदी पुरस्कारांचे मानकरी होते त्यामुळे त्यांना पगडी घालू द्यायची होती. सातत्याने ब्राह्मणा ना शिव्या घालणारे शरद पवार ब्राह्मणा च्या कार्यक्रमात का गप्प बसले? की सोयीस्कर रित्या विसरले. बहुजन समाजाच्या सभेत पागोटे त्यांची मते गोळा करायला….. पवारांचे दुटप्पी वागणे अजूनही थांबत नाही. पत,प्रतिष्ठा, पक्ष सगळे गमावून बसले पण सुधारणा अजूनही होत नाही. लोक हो हे फक्त्त मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छित आहे. असो

मा. नरेंद्र मोदी नी सत्काराच्या भाषणाला उत्तरे देताना.कही नावांचा उल्लेख जरूर केला. आमचे मराठी लोक ज्यांना विसरत चालले आहेत अशी नवहि त्यांनी घेतली. विनायक सावरकरांना लंडन मधील शर्मा ना शिफारस केली शिवाजी महाराज शिष्य वृत्ती साठी त्या वर त्यांनी आपले लंडन मधील शिक्षण पूर्ण केले, गोपाळ आगरकर, विष्णुशाश्त्री चिपळूण कर, चाफेकर बंधू, महात्मा फुले, सवित्री बाई फुले इत्यादी नावे घेतली असो चांगले भाषण ऐकावे असे एकमेव नेते आहेत मोदी यात शंका नाही.

आमच्या नेत्यांना मराठी लोक आठवत नाहीत. मराठ्यांची मते मिळवण्या साठी फक्त शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे तेवढाच फक्त्त उपयोग.महाराजांचा एकही गुण कुणी उचलला नाही.खरे तर त्यांचे नाव घेण्याची लायकी कुणात नाही हेच सत्य आहे. शरद पवारांनी सर्जिकल स्ट्राईक वर बोलताना काय सांगितले? औरंगजेब ची गोष्ट, त्यांचा मामा शाहिस्ते खान त्यांची बोटे शिवाजी महाराजांनी कापली इतकेच सांगितले का कापली हे नाही सांगितले… पुढची गोष्ट अल्पसंख्यका समोर सांगायला लाज वाटत होती का? का पूर्ण गोष्ट सांगून त्यांची तोंडे का नाही बंद केलीत पवारांनी? हे आमचे घरभेदी आहेत अशा लोकांमुळेच राष्ट्र रसातळाला जाते. छत्रपतींच्या काळात अशाच घरभेद्यानी इंग्रजाना भारतात प्रवेश दिला आणि भारतात इंग्रज स्थिर झाले.

 

– कल्पना तेंडुलकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − three =