You are currently viewing वेंगुर्ल्यात ३ व ४ फेब्रुवारी रोजी शाश्वत कला-क्रीडा जागृतोत्सव

वेंगुर्ल्यात ३ व ४ फेब्रुवारी रोजी शाश्वत कला-क्रीडा जागृतोत्सव

वेंगुर्ल्यात ३ व ४ फेब्रुवारी रोजी शाश्वत कला-क्रीडा जागृतोत्सव

वेंगुर्ला

शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व जागृती कला-क्रीडा सांस्कृतिक मंडळ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दीपकमाई केसरकर मित्रमंडळ व शिवसेना वेंगुर्ला पुरस्कृत संजय मालवणकर स्मृती शाश्वत कला-क्रीडा जागृतोत्सव २०२४ चे आयोजन केले आहे.

जागृतोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता २ ते ६ वर्षे वयोगटातील बालवाडीतील मुलांसाठी बडबडगीत्त स्पर्धा, ५ वाजता संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा, स्पर्धकांना मनाचे श्लोक, रामरक्षा, हनुमान चालिसा, भगवतगीता, पसायदान आदी संस्कृत श्लोक सादर करता येतील, ६ वाजता बालवाडीतील मुलांसाठी मनपसंत फॅन्सीड्रेस स्पर्धा, संवाद बोलणे बंधनकारक नाही. सायं. ७ वाजता फक्त वेंगुर्ला तालुक्यातील बालवाडीत शिकणा-या मुलांसाठी बालनृत्य स्पर्धा होणार आहे. सादरीकरणासाठी कमाल ३ मिनिटे वेळ निर्धारित करण्यात आला आहे. चारही स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३००, २००, १०० व १०० रुपयांची शालोपयोगी भेटवस्तू तसेच प्रथम तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सहभागी सर्वांना प्रमाणपत्र पारितोषिक स्वरुपात देण्यात येईल. सायंकाळी ६.३० वाजता पहिली ते चौथी व पाचची ते दहावी गटासाठी सवेश अभिनय स्पर्धा, मुलांना कोणताही समाजसुधारक, राष्ट्रीय नेता, ऐतिहासिक, पौराणिक पात्र, समाजप्रबोधन, सामाजिक व्यथा मांडणारी व्यक्तिमत्वे यापैकी कोणतीही एक वेशभूषा सादर करता येईल. पहिली ते चौथीसाठी अनुक्रमे ५००, ३००, २००, १००, १०० रुपये पाचवी ते दहावीसाठी ७००, ५००, ३००, २००, १०० अशी रोख पारितोषिके तसेच प्रथम तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येईल. ७.३० वाजता केवळ वेंगुर्ला तालुक्यातील शालेय मुलांसाठी एकेरी नृत्य स्पर्धा, सादरीकरणासाठी कमाल ३ मिनिटे वेळ मर्यादा आहे. पहिली ते चौथी गटासाठी ५००, ३००, २००, १००, १००, पाचवी ते सातवी गटासाठी ७००, ५००, ३००, २००, १०० व आठवी ते दहावी गटासाठी १०००, ७००, ५००, ३००, २०० अशी रोख बक्षिसे तसेच प्रथम तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता कॅम्प येथील मैदानावर ‘स्वच्छ सुंदर वेंगुर्ल्यासाठी एक धाव‘ या शीर्षकाखाली जिल्हास्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धा होणार. बालवाडीत शिकणा-या मुली व मुलांच्या गटासाठी ५० मीटर एवढे अंतर धावायचे आहे. प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३००, २००, १००, १०० रुपये किंमतीची शालेपयोगी भेटवस्तू देण्यात येईल. पहिली ते दुसरी मुली व मुलांच्या संघासाठी २०० मीटर अंतर, तिसरी ते चौथी मुली व मुलांच्या गटासाठी अर्धा किलोमीटर अंतर धावायचे आहे. चारही गटातील विजेत्यांना अनुक्रमे रोख ५००, ३००, २००, १००, १०० रुपये, पाचवी ते सातवी गटासाठी एक किलोमीटर अंतर धावायचे आहे. प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे रोख ७००, ५००, ३००, २००, १०० रुपये तर आठवी ते दहावीच्या मुली व मुलगे गटासाठी २ किलोमीटर अंतर धावावे लागणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे रोख १०००, ७००, ५००, ३००, २०० रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. महिला व पुरुष खुल्या गटासाठी ५ किलोमीटर अंतर धावावे लागणार आहे. विजेत्यांना १५००, १०००, ७००, ५००, ३००, २०० अशी रोख रक्कमेची बक्षिसे तर मॅरेथॉनच्या बाराही गटातील प्रथम तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सहभागी सर्वांनाच सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

याच दिवशी सकाळी १०.३० वाजता भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात बालवाडीतील चिमुकल्यांसाठी रंगभरण तर शालेय मुलांसाठी बालकुमार चित्रकला स्पर्धा होणार आहे. बालवाडी गटासाठी ५००, ३००, २००, १००, १०० रुपयांची शालेपयोगी भेटवस्तू देण्यात येईल. बालकुमार चित्रकलेच्या पहिली ते चौथी गटासाठी ‘माझा आवडता प्राणी‘ विषय असून पाच विजेत्यांना रोख ५००, ३००, २००, १००, १०० रुपये, तर पाचवी ते दहावी गटासाठी ‘माझा आवडता सण‘ हा विषय देण्यात आला आहे. पाच विजेत्यांना रोख ७००, ५००, ३००, २००, १०० अशी बक्षिसे तसेच सर्वच गटातील पथम तीन विजेत्यांना स्मृतिचिन्हे व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

४ रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हास्तरीय माय-लेकरू नृत्य स्पर्धा होणार आहे. यात आई व मुल किवा बाबा व मुल सहभाग घेऊ शकतात. प्रथम पाच विजेत्यांना रोख २०००, १५००, १०००, ५००, ३०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. याचदरम्यान व विधन परवार स्मृती जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. वयाचे बंधन नाही. समुहात किमान पाच मुलांचा सामावेश अत्यावश्यक आहे विजेत्यांना रोख ५०००, ३०००, २०००, १०००, १००० अशी पारितोषिके तसेच दोन्ही स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =