You are currently viewing दशावतारी नाट्य महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद कौतुकास्पद – ॲड. अभय खांडेपारकर

दशावतारी नाट्य महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद कौतुकास्पद – ॲड. अभय खांडेपारकर

रेडीतील दशावतार नाट्य महोत्सवाचा समारोप…

वेंगुर्ले

रेडी सारख्या गावात आयोजित करण्यात आलेला हा दशावतारी नाट्य महोत्सव आणि या महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. या महोत्सवाला माझ्या शुभेच्छा आहेत. ही दशावतार लोककला इतर लोकनाट्यांप्रमाणे राज्यात देशात आणि सर्वत्र आपली वेगळी अशी ओळख याही पुढे निर्माण करेल असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ नामांकित वकील ॲड. अभय खांडेपारकर यांनी रेडी येथे बोलताना व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री नाम. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितेश राऊळ मित्रमंडळ पुरस्कृत आणी दशावतार कला प्रेमी ग्रुप रेडी आयोजित रेडी येथील भव्य दशावतार नाट्य महोत्सव २०२३ चा समारोप मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ नामांकित वकील ॲड. अभय खांडेपारकर यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. रेडी येथील या दशावतारी नाट्य महोत्सवाला ग्रामस्थ व नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. अभय खांडेपारकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग चे प्रसिद्ध वकील अँड. अजित भणगे, सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, वेंगुर्ला तालुका भाजपा अद्यक्ष सुहास गवंडळकर, उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, बाबली वायंगणकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी युवा दशावतार कलाकार स्वप्नील नाईक, पकवाज वादक भावेश राणे यांचा तसेच ॲड. खांडेपारकर व अन्य मान्यवरांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊ आजगावकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा