You are currently viewing सावंतवाडीतील वकील संघटनेच्या क्रिकेट स्पर्धेत “युनायटेड सिंधुदुर्ग” संघाची बाजी…

सावंतवाडीतील वकील संघटनेच्या क्रिकेट स्पर्धेत “युनायटेड सिंधुदुर्ग” संघाची बाजी…

सावंतवाडीतील वकील संघटनेच्या क्रिकेट स्पर्धेत “युनायटेड सिंधुदुर्ग” संघाची बाजी…

ॲड.परिमल नाईकांच्या हस्ते बक्षीस वितरण; प्रविण काळसेकर ठरला सर्वोत्तम खेळाडू

सावंतवाडी

वकील संघटनेच्या माध्यमातून कै. सुहेब डिंगणकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ जिमखाना मैदानावर घेण्यात आलेल्या वकीलांच्या क्रिकेट स्पर्धेचा युनायटेड सिंधुदुर्ग संघ विजता ठरला. तर पुणे संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेदरम्यान अ‍ॅड. प्रविण काळसेकर यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. परिमल नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. निमंत्रित वकीलांच्या संघाना या क्रिकेट स्पर्धेत खेळविण्यात आले.

यात गोवा, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर, जालना, बेळगाव आदी संघानी सहभाग घेतला होता. यावेळी अँड. दिलीप नार्वेकर, सुभाष पणदूरकर, प्रकाश परब, नीता सावंत, शाम सावंत, पी. डी. देसाई, बंड्या मांडकुळकर, अनिल केसरकर, अण्णा बांदेकर, नीलिमा गावडे, डी. के. गावकर, राघवेंद्र नार्वेकर आदी उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा