You are currently viewing कणकवलीत उड्डाणपुलावर लावण्यात आलेल्या फलकामुळे उड्डाण पुलाच्या नामकरणाची चर्चा…

कणकवलीत उड्डाणपुलावर लावण्यात आलेल्या फलकामुळे उड्डाण पुलाच्या नामकरणाची चर्चा…

कणकवलीत उड्डाणपुलावर लावण्यात आलेल्या फलकामुळे उड्डाण पुलाच्या नामकरणाची चर्चा…

कणकवली

शहरातून गेलेल्या उड्डाणपुलावर “परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल” असे नामकरण झालेला बॅनर लावण्यात आली आहे. त्यामुळे कणकवलीत उड्डाण पूल नामकरणाची चर्चा आज शहरात आहे.

कणकवलीत सध्या भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुरू आहे. यात कणकवलीतील भालचंद्र महाराजांचे भक्त व कणकवलीकर यांच्याकडून आज सोमवारी पहाटेच्या सुमारास हे नामकरण करण्यात आले. कणकवली पटवर्धन चौकामध्ये बाजारपेठ कडे येणाऱ्या रस्त्याच्या दिशेने हा नामकरण फलक लावण्यात आला असून या फलकावर भालचंद्र महाराज यांच्यासह आप्पासाहेब पटवर्धन यांचा फोटो व स्वयंभु रवळनाथ या ग्रामदेवतेचे नाव देखील लावले आहे. कणकवली शहरातील उड्डाण पुलाला भालचंद्र महाराज यांच्या सोबतच आप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव देण्याची ही मागणी काही वर्ष सुरू होती. अद्याप पर्यंत या उड्डाणपुलाला नाव देण्या बाबत निर्णय झालेला नाही. मात्र आज कणकवली शहरात पहाटे घडलेली ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा