You are currently viewing ओंजळीतील शब्दफुले समूहाचे “आम्ही ओंजळकर” साहित्य संमेलन थाटात संपन्न

ओंजळीतील शब्दफुले समूहाचे “आम्ही ओंजळकर” साहित्य संमेलन थाटात संपन्न

डोंबिवली:

रविवार दि.२८ जानेवारी २०२४ रोजी ओजळीतील शब्दफुले समूहाचे ‘आम्ही ओंजळकर…” साहित्य संमेलन विनायक सभागृह दुसरा, गणपती मंदिर, डोंबिवली येथे संपन्न झाले.

सकाळच्या सत्रात विजय जोशी (विजो) यांच्या ‘वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मा.श्री.चन्द्रशेखर टिळक आणि डॉ.विजय जोशी (ऑस्ट्रेलिया) यांच्या हस्ते संपन्न झाले.

उद्घाटक अतिथी कवी लेखक अर्थतज्ज्ञ व्याख्याते मा.श्री.चन्द्रशेखर टिळक यांनी आपण पुस्तके, माणसे, समाज हे सारे डोळसपणे कसे वाचले पाहिजेत या अनुषंगाने साहित्याच्या दृष्टीने वाचनाचे महत्व विषद केले.

तर दुपारच्या कवी संमेलन सत्रात कवी संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ कवी लेखक समीक्षक संपादक मा.श्री.नारायण लाळे यांनी इतरांचं अनुकरण न करता आपण स्वत:चं लिहिलं पाहिजे, स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण केली पाहिजे…’ अशा भावना उपस्थितांसमोर व्यक्त केल्या.

दिवसभरात पुस्तक प्रकाशन, अभिवाचन, काव्यस्मृतीगंध, कवी संमेलन, मान्यवरांचे विचार अशी विविध सत्रे संपन्न झाली.

हे संमेलन यशस्वी होण्यासाठी विजय जोशी, चैत्राली जोगळेकर, मानसी चापेकर, अनंत जोशी, रवींद्र कारेकर, अजित महाडकर, पद्माकर भावे… यांनी विशेष मेहनत घेतली.

आपला स्नेहांकित

विजो (विजय जोशी)

डोंबिवली

9892752242

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा