You are currently viewing कोकण विकासाच्या ; हिताच्या आड येणारे राजकारण करू नका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे

कोकण विकासाच्या ; हिताच्या आड येणारे राजकारण करू नका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे

लक्ष्मीनारायण मंदिर येथील तलावाचे सुशोभिकरण व अन्य विकास कामांसाठी खासदार नारायण राणे यांच्याकडून 50 लाख रुपये निधी देण्याची घोषणा..

कुडाळ तालुक्यातील वालावल येथे श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच नवीन बांधण्यात येणार्‍या अन्नपूर्णा इमारतीचे भूमिपूजन, संगणक कक्षाचे उद्घाटन, रुग्णवाहिका लोकार्पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भाजपा खासदार नारायण राणे साहेब यांच्या शुभहस्ते वालावल येथे संपन्न झाले यावेळी उपस्थित लक्ष्मी नारायण स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, महाराष्ट्र देवस्थान समिती सदस्य चारुदत्त देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, पत्रकार राजेश कोचरेकर, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, भाजप नेते राजू राऊळ, कुडाळ पंचायत समिती सभापती नुतून आईर, राजेश प्रभू, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, तालुका अध्यक्ष विनायक राणे, वालावल सरपंच निलेश साळसकर आदी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 8 =