You are currently viewing शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी

धर्मवीर आनंद दिघे जयंतीच्या औचित्य साधून आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज दिनांक २७ रोजी जयंती साजरी करण्यात आले. यावेळी दिघेसाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधुन अथायु हॉस्पिटल कोल्हापूर व शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले, त्यात हृदयविकार, मधुमेह,कॅन्सर,गुडघेदुखी आदी विकारांची तपासणी करण्यात आली,यावेळी कणकवली तालुक्यातील बऱ्याच रुग्णांनी याचा लाभ घेतला.

सर्वप्रथम जिल्हाप्रमुख संजय आंग्रे साहेबांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,त्यानंतर हृदयविकार तज्ञ डॉ बी.जी. शेळके साहेबांनी athau चे डॉ श्री मुळीक साहेब यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.त्यानंतर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख श्री.संजय आंग्रे साहेब,उपजिल्हाप्रमुख श्री.महिंद्र सावंत,शेखर राणे ,तालुका समन्वयक सुनील पारकर,महिला तालुका प्रमुख सौ. टेमकर मॅडम,उपतालुका प्रमुख श्री.सुनील सावंत,निलेश तेली,चिन्मय रावराणे, विश्राम सावंत,भाई पावसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा