You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सबज्युनियर अॅथलेटिक काॅम्पिटीशनमध्ये स्टेपिंग स्टोनच्या विद्यार्थ्यांचा डंका :

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सबज्युनियर अॅथलेटिक काॅम्पिटीशनमध्ये स्टेपिंग स्टोनच्या विद्यार्थ्यांचा डंका :

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सबज्युनियर अॅथलेटिक काॅम्पिटीशनमध्ये स्टेपिंग स्टोनच्या विद्यार्थ्यांचा डंका :

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सबज्युनियर अॅथलेटिक काॅम्पिटीशनमध्ये स्टेपिंग स्टोनच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने सहभाग घेतला. या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांना ओरोस क्रिडा संकुल येथे नेण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ७४ विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी, इयत्ता ८ वर्षाखालील विद्यार्थिनींपैकी ‘ लांब उडी ‘ स्पर्धेमध्ये इयत्ता १ ली तील ‘ कु. आनंदी धोंड ‘ प्रथम क्रमांकाने , ‘ कु. नुरवी मसुरकर ‘ द्वितीय क्रमांकाने व ‘ कु. राज्वी गोंधवले ‘ ही तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाली. तसेच, ८ वर्षांच्या मुलांच्या गटातील इयत्ता १ ली तील ‘ कु. बाळकृष्ण परब ‘ दुसऱ्या क्रमांकाने व ‘ कु. दर्श राणा ‘ हे विद्यार्थी तृतीय क्रमांकाने विजयी झाले. याच स्पर्धेत १० वर्षाखालील गटात ‘ कु. अंश मासंग ‘ हा विद्यार्थी तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाला. ‘ उंच उडी ‘ या स्पर्धेमध्ये १२ वर्षाखालील मुलींमध्ये ‘ कु. वैदेही शिरोडकर ‘ ही दुसऱ्या क्रमांकाने व ‘ कु. श्री कोरगावकर ‘ तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाली. तर मुलांमध्ये ‘ कु. मोझेस महाडे ‘ द्वितीय क्रमांकाने विजयी झाला. ‘ चेंडू फेक ‘ स्पर्धेमध्ये ८ वर्षाखालील मुलींच्या गटातील इयत्ता १ ली तील ‘कु. क्रिशा साळवी ‘ पहिल्या क्रमांकाने, ‘ कु. वेदश्री तेली ‘ दुसऱ्या क्रमांकाने व ‘ कु. अस्मि सावंत ‘ ही तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाली. तर मुलांमध्ये ‘ कु. विवान पंढुरकर’ हा तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाला. १० वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये ‘ गोळा फेक ‘ स्पर्धेत इयत्ता २ री तील ‘ रेयांश हावळ ‘ तिसऱ्या व मुलींमधील इयत्ता ३ री तील लिशा सामंत दुसऱ्या क्रमांकाने विजयी झाली. तसेच १२ वर्षाखालील गटामध्ये अनुक्रमे, इयत्ता ४ थी मधील ‘ कु. भुवन दळवी ‘ प्रथम क्रमांकाने व इयत्ता ५ वी तील ‘ कु. श्री कोरगावकर ‘ प्रथम क्रमांकाने, ‘ कु. तन्मयी परब ‘ तिसऱ्या क्रमांकाने व ‘ कु. वैष्णव सावंत ‘ दुसऱ्या क्रमांकाने विजयी झाला. ‘ ५० मीटर धावणे ‘ या स्पर्धेत ८ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये इयत्ता १ ली तील ‘ कु. इशिता नाईक ही पहिल्या क्रमांकाने, ‘ कु. वेदश्री तेली’ ही दुसऱ्या क्रमांकाने, ‘ कु. काव्या कांबळी ‘ ही तिसऱ्या क्रमांकाने व मुलांमध्ये ‘ कु. दर्शन परब ‘ तिसऱ्या क्रमांकाने तर १० वर्षाखालील मुलांमध्ये इयत्ता ३ री मधील ‘ हार्दिक पवार ‘ हा तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाला. ‘१०० मीटर धावणे ‘ स्पर्धेत ८ वर्षाखालील मुलींच्या गटात इयत्ता १ ली मधील ‘ कु. राज्वी गोंधवले ‘ पहिल्या क्रमांकाने व ‘ कु. आनंदी धोंड ‘ ही दुसऱ्या क्रमांकाने विजयी झाली. त्याचप्रमाणे, १२ वर्षखलील गटामध्ये इयत्ता ५ वी मधील ‘ कु. रोनक पवार ‘ या विद्यार्थ्याने ‘३०० मीटर धावणे’ या स्पर्धेत दुसरा क्रमांक, ‘ उंच उडी ‘ स्पर्धेत तिसरा क्रमांक व ‘६० मीटर धावणे ‘ या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्पोर्ट सर ‘ श्री. हमीद शेख ‘ व ‘ श्री. समद शेख ‘ यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक ‘श्री. रुजुल पाटणकर’ व मुख्याध्यापिका ‘सौ. दिशा कामत ‘ यांनी स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा