You are currently viewing मदरस्यावर तिरंगा फडकावून वैभववाडीत प्रजासत्ताक दिन केला साजरा

मदरस्यावर तिरंगा फडकावून वैभववाडीत प्रजासत्ताक दिन केला साजरा

मदरस्यावर तिरंगा फडकावून वैभववाडीत प्रजासत्ताक दिन केला साजरा*

*’अदबीया फाउंडेशन’ संचालित ‘मकतब ए सुलेमान’ मदरस्यात प्रजासत्ताक दिन साजरा केल्याने होतेय सर्वत्र कौतुक*

वैभववाडी

राज्यात अनेक ठिकाणी वातावरण बिघडवण्याचे सत्र सुरु असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील तिथवली-काझीवाडी येथील मुस्लिम समुदायाने मदरस्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा फडकावून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

तिथवली-काझीवाडीतील ‘अदबीया फाउंडेशन’ संचालित ‘मकतब ए सुलेमान’ मदरस्यात मुस्लिम समुदायांनी एकत्रित येत मदरस्याच्या पटांगणात राष्ट्रगीत गाऊन झेंडा फडकावून त्यांनी जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीचा सर्वांकडून कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाला माजी जि. प. उपाध्यक्ष नासीर काझी, फाउंडेशनचे अध्यक्ष हमीद काझी, उपाध्यक्ष इब्राहिम काझी, साजिद काझी, गुलजार काझी, अब्दुल रऊफ काझी, निसार सोलकर, मजीद सोलकर, हरून इसफ, नोमान इसफ, अबीद काझी, इक्बाल अजीज काझी, महम्मद काझी, मसूद काझी, निजाम काझी, मुबीन काझी, अल्ताफ काझी व मदरस्याचे शिक्षक खालिद धोपावकर तसेच मदरस्यातील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा