You are currently viewing सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या शोधाला भारत सरकारकडून पेटंट बहाल

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या शोधाला भारत सरकारकडून पेटंट बहाल

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या शोधाला भारत सरकारकडून पेटंट बहाल

कणकवली

अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवलीचे प्र. प्राचार्य महेश साटम , माजी प्राचार्य डॉ. अनीश चिंतामण गांगल व मेकॅनिकल विभागाचे प्रा. कल्पेश सुनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल विभागाचे विद्यार्थी कु. अदित्य मनोज डोयले, कु. अदित्य राजेश चौघुले व इलेक्ट्रिकल विभागाची विद्यार्थीनी कु. गौरांगी अजय सावंत यांनी ” पोर्टेबल वॉर्म-चिलर कंटेनर” या उपकरणाच्या डिझाईन पेटंटची भारत सरकारकडे नोंद केली होती , त्यास मंजुरी मिळून सरकारकडून त्यांना पेटंट मिळाले व याचा शोधनिबंध देखील आँफिशिअल जर्नल आँफ पेटंट आँफीस इंडिया मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

या पेटंटचा उपयोग भविष्यात अन्न संरक्षण , अन्न गरम तसेच थंड करण्यासाठी होणार असून त्याबाबतचे पेटंट मिळणे ही संस्थेसाठी व महाविद्यालयासाठी गौरवाची बाब असल्याची भावना महाविद्यालयाच्या अध्यक्षा सन्मा. सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष सन्मा. निलेशजी राणे, सचिव सन्मा. नितेशजी राणे, अँडमिनिस्ट्रेटीव्ह आँफीसर श्री. शांतेश रावराणे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यक्त केली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा