You are currently viewing स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ          

स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ          

– कृषि आयुक्त धीरजकुमार                           

सिंधुदुर्गनगरी 

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरीददार यांच्याकडून अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती, कृषि आयुक्त धीरजकुमार यांनी दिली.

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरीददार यांच्याकडून अर्ज मागविण्याची अंतिम मुदत दिनांक 15 डिसेंबर 2020 होती. यास मुदत वाढ देण्यात येत असून आता अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 अशी राहणार आहे. या प्रकल्पातून सर्वसमावेशक आणि स्पर्धाक्षम मूल्य साखळ्या विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या समुदाय आधारित संस्थांनी मूल्य साखळी विकासाचे उपक्रम कल्पना ऑनलाइन सादर करण्याचे आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत सुमारे 1 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. तथापि शेतकऱ्यांची आणि खरेदीदार संस्थांची मागणी लक्षात घेऊन मुदतवाढ देण्यात येत आहे. अशी माहिती प्रकल्प संचालक स्मार्ट तथा राज्याचे कृषि आयुक्त धीरजकुमार यांनी दिलेली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.smart-mh.org  संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 2 =